Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरूणांनी धार्मिक कर्मकांडातून बाहेर पडावे ः राजन खान

पाथर्डी/प्रतिनिधी ः आपला भारतीय समाज हा भावना प्रधान व रुढी परंपरा माननारा आहे.,तरुणानी अंधश्रद्धांना जास्त खतपाणी न घालता स्वतः आत्मनिर्भर कसं ह

राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरू राहणार; शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण
वेश्यांसाठी आलेल्या अनुदानात अपहार | DAINIK LOKMNTHAN
तात्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत जाहीर करा

पाथर्डी/प्रतिनिधी ः आपला भारतीय समाज हा भावना प्रधान व रुढी परंपरा माननारा आहे.,तरुणानी अंधश्रद्धांना जास्त खतपाणी न घालता स्वतः आत्मनिर्भर कसं होता येईल व स्वतः मेहनतीने स्वतः ची व समाजाची कशी प्रगती साधता येईल यावर लक्ष केंद्रित करावे असे परखड मत जेष्ठ लेखक व साहित्यिक राजन खान राजीव फाऊंडेशन यांनी कृष्णा भोजनालय येथे आयोजित केलेल्या संवाद सहवास कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी पाथर्डी शहरातील तरुण विद्यार्थी, विश्‍वनाथ जोशी, संतराम साबळे, मोरे, वसंत बोर्डे, सुभाष हंडाळ,श्रिकांत काळोखे, किसन आव्हाड व अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना खान यांनी म्हटले की, मागील काही वर्षांपासून देशामध्ये राजकीय फायद्यासाठी विविध जाती धर्मात कसा तेढ निर्माण करता येईल व त्यामध्यमातून कशी सत्ता काबीज करता येईल यासाठी राजकीय पुढारी कार्यरत आहेत.अशा कावेबाज पुढार्‍यापासून समाजाने दूर रहावे व मतदानाच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असं ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलीम शेख यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक व्यवहारे व अरविंद सोनटक्के यांनी केले.

COMMENTS