Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्षयरोग निवारणासाठी तरुणांनी जनजागृती करावी

डॉ. शशांक वाघमारे यांचे आवाहन ः जामखेडमध्ये काढली जनजागृती रॅली

जामखेड/प्रतिनिधी ः क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे. एकेकाळी दूर्धर असलेला हा आजार आजमितीस पूर्ण बरा होता. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्य

नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुखाला मिरवणुकीत गटबाजीचा राडा l पहा LokNews24
अपहरण केलेल्या महिलेवर सलग पाच दिवस अत्याचार
भंडारदरा येथुन पळवुन नेलेल्या मुलीचा खुन

जामखेड/प्रतिनिधी ः क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे. एकेकाळी दूर्धर असलेला हा आजार आजमितीस पूर्ण बरा होता. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले. यात मुख्यतः 75 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. तरुणांनी सजग राहून क्षयरोग निवारणासाठी पुढे यावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशांक वाघमारे यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने स्नेहालय स्नेहसक्षम प्रकल्प अहमदनगर,ग्रामीण रुग्णालय जामखेड,17 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.व टी.बी.विभाग जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग निवारण शिबीर  प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जामखेड शहरातून जाणीव जागृती रॅली काढण्यात आली.यावेळी वैदयकीय अधिक्षक डॉ.शशांक वाघमारे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,डॉ.युवराज खराडे यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी प्राचार्य बी.के.मडके, पी.ए. तांबे, व्ही.के. कोकाटे, लतिका सातपुते,दादासाहेब खाडे, एन.सी.सी.ऑफिसर प्रा.गौतम केळकर,प्रा.अनिल देडे,प्रा.मयूर भोसले,मजहर खान,अरुण घुंगरट उपस्थित होते. इ.स.1882 साली डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पुढे बोलतांना डॉ. वाघमारे म्हणाले की; ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला,थुंकला किंवा शिंकला तरी त्यातून जवळ असलेल्या  निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, स्वच्छ ता बाळगणे जरूरीचे असते अशी माहिती देत क्षयरोग व एच.आय.व्ही-एड्सवर जाणीव जागृती निर्माण करूया अशी सादही त्यांनी तरुणाईला घातली. यावेळी आय.सी.टी.सी.समुपदेशक सुप्रिया कांबळे, गट प्रवर्तक सुवर्णा हजारे,रेखा अवसरे, तालुक्यात आरोग्य विषयी काम करणारे आशा स्वयंसेविका तसेच महाविद्यालायचे सर्व विध्यार्थी-विध्यार्थिनींसह एन.सी.सी.कॅडेट, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून रॅलीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश अब्दुले यांनी केले तर प्रस्ताविक अरुण घुंगरट,आभार दादासाहेब खाडे यांनी मानले.

COMMENTS