मध्यप्रदेश प्रतिनिधी - नाचताना, बोलताना किंवा जिममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजकाल समोर येत आहेत. या घटनांमध्ये
मध्यप्रदेश प्रतिनिधी – नाचताना, बोलताना किंवा जिममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजकाल समोर येत आहेत. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता अशीच आणखी एक घटना मध्य प्रदेशच्या रीवामधून समोर आली आहे. ज्यात डान्स करत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. यात हा व्यक्ती जमिनीवर कोसळला. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे लग्न समारंभात आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं. ही वरात उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून रीवामध्ये आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील कानपूर येथून ही वरात आली होती. लग्न समारंभासाठी वरातीतील लोक बँडच्या तालावर नाचत लग्नाच्या ठिकाणी जात होते. वरातीत सहभागी असलेला 32 वर्षीय अभय सचनही नाचत होता. त्याचवेळी अभय अचानक जमिनीवर पडला. लोकांना काही समजेपर्यंत अभयचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर विवाह सोहळ्याच्या आनंदाचं क्षणात दुःखात रुपांतर झालं. घाईगडबडीत अभयला संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत अभयचा मृत्यू झाला होता. अभयचे घर एजी आवास विकास कॉलनी, हंसापुरम, कानपूर येथे असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच अभयचे कुटुंबीय रीवा येथे आले.
COMMENTS