Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणसाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई प्रतिनिधि - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आहे. सुनील कावळे

आंदोलनाच्या मंडपातच केला आयुष्याचा शेवट
स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या
संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

मुंबई प्रतिनिधि – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आहे. सुनील कावळे असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव असून त्याचे वय 45 वर्ष असल्याचे सांगितले जाता आहे. मुळचा अंबड तालुक्यातील रहिवासी सुनीलने मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली असून यात त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे.  या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला असून या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे

COMMENTS