Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

हिंगोली ः मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र केला असतांनाच, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातीरल वडद येथील बालाजी सुधाकर नेव्हल

9  वर्षीय इन्स्टा क्वीनची आत्महत्या
जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी अडवणूक, देहर्‍याच्या युवकाने केली आत्महत्या
निवडणुकीसाठी 5 लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी छळ.

हिंगोली ः मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र केला असतांनाच, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातीरल वडद येथील बालाजी सुधाकर नेव्हल (35) या तरुणाने टीव्ही केबलने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्हयातील मागील दोन दिवसांतील हि दुसरी तर आता पर्यंतची पंधरावी आत्महत्या आहे.
औंढा तालुक्यातील वडद येथील बालाजी हे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रीय होते. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्हयात झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. त्यानंतरही सरकार कडून आरक्षणाबाबत कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला जात नसल्याने ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे दोन मुलांना कसे शिक्षण द्यावे त्यांना नोकरी लागणार नाही त्यामुळे कसे व्हावे असे ते नेहमीच कुटूुंबियांना बोलून दाखवत होते. सोमवारी ता. 10 रात्रीच्या सुमारास ते जेवण करून त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर खिडकीच्या लोखंडी जाळीला टीव्हीच्या केबलने त्यांनी गळफास घेतला. काही वेळातच त्यांच्या कुटुंबियांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.

COMMENTS