बोल्हेगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोल्हेगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर शहरात गळफास लावून घेत तरुणाने आत्महत्या केली. गौतम ज्ञानदेव कापडे (वय 32, रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) असे आत्महत्या केलेल्या

ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे : पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोपरगाव-झगडेफाटा रोडवर कंटेनरने रिक्षाला चिरडले ; सात ठार तीन जखमी
चापडगावमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची बैठक उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर शहरात गळफास लावून घेत तरुणाने आत्महत्या केली. गौतम ज्ञानदेव कापडे (वय 32, रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बोल्हेगाव उपनगरात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आला आहे. गौतम याने शेतामधील कांदा शेडमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गौतम याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच गौतमच्या नातेवाईक, मित्रांनी जिल्हा रुग्णालय धाव घेतली असून तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS