अहमदनगर : शेतातील विहिरीवर वीज पंप चालू करायला गेलेल्या 37 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील जखणगाव शिवारात
अहमदनगर : शेतातील विहिरीवर वीज पंप चालू करायला गेलेल्या 37 वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील जखणगाव शिवारात वाळके मळा येथे घडली. जावेद बशीर शेख (वय 37 राहणार जखणगाव तालुका नगर असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
महेश जावेद शेख हे लखनगाव शिवारात वाळके मळा येथे असलेल्या शेतात गेली होती तेथील विहिरीवर असलेला वीज पंप सुरू करण्यासाठी ते गेले असता त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला त्यामुळे ते खाली पडून बेशुद्ध झाले त्यांना त्यांचे नातेवाईक सलीम नजीर शेख यांनी उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोठे यांनी त्यांना उपचार पूर्वीच मयत घोषित केले. याबाबतची माहिती दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार जीजी बोर्डे यांनी नगर तालुका पोलीस यांना कळवली या माहितीवरून नगर तालुका पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली.
COMMENTS