HomeUncategorized

Yeola : येवला तालुक्यातील धुळगाव येथील भूमिपुत्राला अखेरचा सलाम (Video)

येवला तालुक्यातील धुळगाव येथील जवान लान्स नायक सचिन गायकवाड याचा  पुणे येथे कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू  झाला. जवान सचिन

वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट
राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला

येवला तालुक्यातील धुळगाव येथील जवान लान्स नायक सचिन गायकवाड याचा  पुणे येथे कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू  झाला. जवान सचिन यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे धुळगाव  सह संपूर्ण येवला तालुक्यात शोककळा पसरली . दिनांक 3 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी 3 वाजता अत्यंत शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी अत्यंत शोकाकुळ वातावरणात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात लान्स नायक सचिन गायकवाड. यांना अखेरचा निरोप दिला.
याप्रसंगी येवला तालुक्यातील येवला ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी येवला तहसीलदार प्रमोद हिले तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व जनसमुदाय मोठ्या संख्येने अखेरचा निरोप देण्यासाठी  उपस्थित होता.

COMMENTS