Xiaomi एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी अनेक नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. मात्र कंपनी फक्त मोबाईल्स नव्हे तर
Xiaomi एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी अनेक नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत असते. मात्र कंपनी फक्त मोबाईल्स नव्हे तर अनेक गॅजेट्सचे उत्पादन करते. Xiaomi ने आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. Xiaomi ने आपले Redmi Watch 3 लॉन्च केले आहे. तर या स्मार्टवॉचचे फीचर्स, किंमत आणि स्पेसीफिकेशन्स जाणून घेऊयात. Redmi Watch 3 चे फीचर्स शाओमीच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये १.७५ इंचाचा AMOLED डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचे रिझोल्युशन ३९०x४५० पिक्सल इतके आहे. ज्याचा ब्राईटनेस ६०० नीट्स इतके आहे. या स्मार्टवॉचचे वजन एकूण ३७ ग्रॅम इतके आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट व इमर्जन्सी कॉल फिचर देखील मिळणार आहे. , जाणून घ्या रेडमी वॉच 3 मध्ये १२१ स्पोर्ट्स मोड आहेत ज्यात आउटडोर रनिंग, सायकलिंग आणि पोहणे इ. यामध्ये घड्याळाच्या बॉक्सला सपोर्ट असलेले १० बिल्ट इन रनिंग बॉक्स आहेत. तसेच यामध्ये ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर, हार्ट रेट ट्रॅकर आणि स्लिप मॉनिटर हे हेल्थ फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला २८९mAh ची बॅटरी मिळेल जी एकदा चार्ज केली १२ दिवसांपर्यंत चालेल. तसेच हे स्मार्टवॉच android 6.0 किंवा iOS 12 नंतर चालणार्या सर्व उपकरणांशी कनेक्ट असणार आहे. काय आहे किंमत ? Redmi Watch 3 ची किंमत युरोपमध्ये ११९ यूरो म्हणजे (१०,६००) रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. भारतीय बाजारात रेडमी वॉच 3 च्या उपलब्धतेबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. Redmi Watch 3 चीनमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.
COMMENTS