श्रीरामपूर : दीपावली सण आनंदाची पर्वणी असते, मानवी जीवनातील अंधार घालविणे आणि प्रकाशाचे पूजन करणे हे जीवनसूत्र या सणाच्या मुळाशी आहे, याच ध्येयां
श्रीरामपूर : दीपावली सण आनंदाची पर्वणी असते, मानवी जीवनातील अंधार घालविणे आणि प्रकाशाचे पूजन करणे हे जीवनसूत्र या सणाच्या मुळाशी आहे, याच ध्येयांनी साहित्यिकांनी ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांच्या अनाथांच्या आश्रमात साजरी केली.
श्रीरामपूर बेलापूर रोडवरील गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात साहित्यिकांनी दिवाळी पाडवा सण विविध उपक्रम आणि देणगीद्वारे साजरी केली. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दीपावली सणाचे महत्त्व सांगत संतांचे आणि साहित्यिकांचे कार्य हें ज्ञानदीप लावू जगी असे आहे. साहित्यिकांच्या लेखनात आणि मनात संतत्त्व, साधुत्त्व असले पाहिजे. ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांचे अनाथांच्या कार्याला देवत्वाची प्रचिती आहे. त्यांना सहकार्य लाभले तर त्यांच्या देवकार्याला गती मिळेल अशी भावना व्यक्त करून साहित्याचे महत्वही सांगितले विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी कृष्णानंद महाराज यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून मायेच्या मायेने दुर्लक्षित अनाथ मुला मुलींना आधार दिला, शिक्षण देत आहेत, चांगले संस्कार करीत आहेत हे कार्य पुण्यशील आहे, असे सांगून श्रीरामपूरच्या साहित्यिकांचा हा वेगळा दिवाळी पाडवा असल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ, साहेबराव सुकळे यांनी आश्रमातीत कार्याचे कौतुक केले. यावेळी सुरेखा बुरकुले, संजय बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, सुयोग बुरकुले, सुबोध बुरकुलेसह आश्रमातील मुले उपस्थित होते. ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांनी सर्वांचे स्वागत करून हा आश्रम सदगुणी मायबापांच्या आधारातून आकाराला आला आहे, अनाथांच्या सहवासात साहित्यिकांनी दिवाळी साजरी केली, याबद्दल आनंद व्यक्त केला. सुखदेव सुकळे यांनी किराणा सामान दिले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कपडे दिले, बाळासाहेब बुरकुले यांनी दोन हजार रुपये तर प्रा. बारगळ यांनी दीड हजार रुपये देणगी दिली. सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.
COMMENTS