Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी ः प्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा देबू राजन खान (वय-27) याने पुणे मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरी आत्महत्या

दारू पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम
शिवसेनेतून फुटलेल्या गद्दारांना माफी नाही…
जामखेड तालुक्यातील तीन रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण

पुणे/प्रतिनिधी ः प्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा देबू राजन खान (वय-27) याने पुणे मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्याचे पार्थिव तळेगाव येथील प्राथमिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. आत्महत्या केली तेव्हा तो घरात एकटाच होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी देबू राजन खान याने लिहून ठेवलेली तीन पानी चिठ्ठी पोलिसांना मिळून आली आहे. त्याची आई, मैत्रीण आणि कर्ज फेडनारे लोक यांच्या नावे चिठ्ठी मधील मजकूर आहे. आईचा चांगला मुलगा आयुष्यात होऊ शकलो नाही. तसेच कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत सांगितले आहे. याबाबत पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहे. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी माहिती दिली की, देबु खान हा तळेगाव दाभाडे परिसरात सोमाटणे फाटा येथे शिंदे वस्ती येथे भाड्याने घर घेऊन रहात होता. राहत्या घरी एकटाच असताना सोमवारी त्याने घराचा दरवाजा न उघडल्याने घरमालक यांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी देबू खान याने घरातील छताला हुकाच्या आधारे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेला मृतदेह मिळून आला आहे. राजन खान हे एक प्रसिद्ध मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. 2003 मध्ये सावंतवाडी येथे भरलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अनेक कथासंग्रह, वैचारिक लेखसंग्रह तसेच काही कांदबर्‍या लिहिल्या आहेत.

COMMENTS