Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाईत आज जगप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी जलसाचे आयोजन

अंबाजोगाई प्रतिनिधी - सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा जयंती उत्सव व दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज शुक्रवार, दिनांक 1 सप्टेंबर रोजी

उपमुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
पत्रकार दातीर खूनप्रकरणाचा तपास उपअधीक्षक मिटकेंकडे
LokNews24 l रेखा जरे यांच्या यशस्विनी बिग्रेडच्या लेटरपॅडचा बाळ बोठेकडून खंडणी उकळण्यासाठी दुरुपयोग?

अंबाजोगाई प्रतिनिधी – सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा जयंती उत्सव व दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज शुक्रवार, दिनांक 1 सप्टेंबर रोजी युवा आंदोलन सामाजिक संघटनेच्या वतीने प्रबोधनपर चळवळीत योगदान देणार्‍या कार्यकर्त्यांचा ह्रद्य सन्मान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी जगप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी जलसाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अंबाजोगाई तालुका व परिसरातील नागरिकांनी आणि प्रवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा आंदोलन सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांनी केले आहे.
शहरातील आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात आज शुक्रवार, दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पँथर व प्रबोधनपर चळवळीत योगदान देणार्‍या कार्यकर्त्यांचा ह्रद्य सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. तसेच यावेळी ज्याची ओळख शिव – फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीतील हल्लाबोल गाण्यांचे वादळ व जो थेट ऑस्करला धडकलेला आहे, त्या जगप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत व त्यांच्या सहकार्‍यांचा विद्रोही आंबेडकरी जलसाचे आयोजन ही करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक अशोक पालके, धीमंत राष्ट्रपाल, हनुमंत गायकवाड, महेश जोगदंड, नकेश कांबळे, अक्षय भुंबे, बळीराम उपाडे, अविनाश हजारे, महेंद्र कांबळे, विकास क्षीरसागर, नितीन वाघमारे, दत्ता उपाडे, राम जोगदंड, बाबा कोरडे, जालिंदर कसबे, रोहिदास गायकवाड आदींनी पुढाकार घेतला आहे.

COMMENTS