Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍वचषकाचा विजय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ः आमदार थोरात

संगमनेर ः देशात सर्वाधिक लोकप्रिय असणारा क्रिकेट हा खेळ भारतीयांचा धर्म झाला आहे. 2011 नंतर भारतीय संघाने अत्यंत मेहनतीने एकजुटीने कर्णधार रोहित

गौतम स्कूलच्या हॉकी संघाचे दिल्लीकडे कूच
आज सत्ता आणि सरकार सांगेल तशी पत्रकारीता सुरू…
लहान मुलांवर कोरोना लसीची बारामतीत चाचणी

संगमनेर ः देशात सर्वाधिक लोकप्रिय असणारा क्रिकेट हा खेळ भारतीयांचा धर्म झाला आहे. 2011 नंतर भारतीय संघाने अत्यंत मेहनतीने एकजुटीने कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली मिळविलेला दैदीप्यमान विजय हा सर्व भारतीयांसाठी सदैव अभिमानास्पद असल्याचे गौरवउद्गार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मा. शिक्षण व महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले असून सर्व विश्‍वविजेत्या टी-ट्वेंटी क्रिकेट संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
भारताने विश्‍वचषक जिंकल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना आमदार थोरात म्हणाले की, टी ट्वेंटी विश्‍वचषक जिंकणे हे भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे खरे.तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे.अत्यंत मेहनतीने एकजुटीने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीयांनी गौरवास्पद कामगिरी केली असून त्यामुळे अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेवर भारतीय संघाने सात धावांनी रोमांचकारी विजय मिळवला. शेवटच्या काही षटकांमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सूर्यकुमार यादवने घेतलेला अफलातून झेल हा खेळाचा टर्निंग पॉईंट ठरला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा यांच्यासह सर्व खेळाडूंनी एकजुटीचे प्रदर्शन करत या विश्‍वचषकात पहिल्या सामन्यापासून शेवटपर्यंत अपराजित राहत मोठ्या दिमाखात विजय मिळवला आहे हा विजय नक्कीच संस्मरणीय असून देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. या निमित्ताने सर्व भारतीय खेळाडूंची अभिनंदन त्यांनी केले असून क्रिकेटमधून एकात्मता, एकी व सांघिक भावना वाढीस लागते असे सांगताना विद्यार्थ्यांनी व युवकांनी मोबाईल पेक्षा मैदानावर खेळले पाहिजे असा आशावाद ही आमदार थोरात यांनी व्यक्त केला. तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, भारत हा अनेक भाषा, अनेक वेशभूषा आणि प्रांत असलेल्या देश आहे. परंतु एकजुटीचे प्रदर्शन करत दिमाखदार पद्धतीने जिंकलेला विश्‍वचषक हा सर्व नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी एकजुटीचे प्रदर्शन करत हा चषक जिंकला असून रोहित शर्मा आणि विराट कोहली या मोठ्या खेळाडूंनी देशासाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्या कामगिरीचा हा गौरव असल्याचीही आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

COMMENTS