Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यू आर्ट्स महाविद्यालयात शैक्षणिक धोरणाविषयी कार्यशाळा उत्साहात

शेवगाव तालुका ः येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक

रेमडेसिविर बाबत आमदार संग्राम जगताप यांनी केले ‘हे’ विधान | ‘आपलं नगर’ | LokNews24
अमृतवाहिनी कॉलेजचा बारावीचा 99.39 टक्के निकाल
अर्बन बँक निवडणूक तुर्त थांबवण्याची सरकारला विनंती

शेवगाव तालुका ः येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव तालुक्यातील महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी उद्घाटक व बीजभाषक म्हणून सोनई येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे उपस्थित होते. त्यांनी बदललेले शैक्षणिक धोरण आणि त्यातील भाषेचे महत्व विशद केले. ते पुढे असेही म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे विद्यार्थी केंद्रित आहे असून यात ज्ञान कौशल्य आणि रोजगार या गोष्टींना महत्व आहे. शालेय शिक्षणाचे स्तर सांगून उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी नवीन आणि भविष्योन्मुखी दृष्टीकोनावर प्रकाश  टाकला. नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयात कोणत्या कोणत्या समित्यांची आवश्यकता आहे याची सविस्तर माहिती दिली. शिक्षकांनी आपल्या विषयानुसार बास्केट तयार कराव्यात आणि त्या विद्यार्थ्यानाही समजावून सांगाव्यात असे मत डॉ. लावरे यांनी  व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरुषोत्तम कुंदे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सर्व व्याख्यात्यांनी शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट कॉन्सीलचे सदस्य डॉ. संदीप पालवे हे मागर्दर्शक म्हणून लाभले. विद्यापीठ पातळीवर नवीन शैक्षणिक धोरणानुसार होणारी प्रभावी अंमलबजावणी सांगून शिक्षकांनी केलेल्या प्रश्‍नाचे निरसन करण्याचे काम समिती द्वारे केले जात आहे असे मत डॉ. पालवे यांनी मांडले. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उपस्थित प्राध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप केले. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, डॉ. सय्यद व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन समन्वयक डॉ. शिवराम कोरडे यांनी केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. रवींद्र वैद्य आणि केले तर आभार डॉ. शिवराम कोरडे यांनी मानले.

COMMENTS