लोणी : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत स्वयंसहायता गटांना खेळते भांडवल आणि छोटी अवजारे खरेदी करण्यासाठी
लोणी : केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत स्वयंसहायता गटांना खेळते भांडवल आणि छोटी अवजारे खरेदी करण्यासाठी बीज भांडवल दिले जाते. हे भांडवल अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित किमान दहा सदस्यांच्या गटासाठी कर्ज अथवा भांडवल म्हणून दिले जाते या योजनेमुळे लहान उद्योगांना मदत होते आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन मिळत आहे यांचा महिला बचत गटांनी लाभ घेऊन लाभ घेऊन पुढे जावे असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथील पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विठ्ठल विखे यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.उत्तमराव कदम आणि संस्थेचे संचालक व सचिव डाॅ.निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायरेन्स संचलित बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित स्वयंसहायता बचत गटातील महिलांसाठी बीज भांडवल प्रशिक्षण कार्यक्रमात डाॅ.विखे बोलत होते.
डॉ.विठ्ठल विखे यांनी प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित महिलांना योजनेचे उद्दिष्ट,त्यामागील शासनाचा हेतू, विविध दुग्धजन्य पदार्थ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उद्यान विद्या विभागाचे डॉ.विलास घुले यांनी फळ प्रक्रिया आणि भाजीपाला प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले तर प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग ,फूड लायसनिंग याविषयी माहिती गृह विज्ञान विभागाच्या सज्जला लांडगे यांनी दिली. कार्यक्रमास परिसरातील महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS