शेवगाव : विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासूनच अर्थार्जन करायला शिकले पाहिजे. प्रत्येक महिलेने छोट्या उद्योगातून कुटुंबाच्या आणि समाजाच्या विकासात भर पडली पाहिजे. आजच्या स्त्रीमध्ये प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचे सामर्थ्य, शक्ती आहे. २०४७ मधील भारतात महिलांना समान संधी, सुरक्षित वातावरण आणि सन्मान मिळेल. महिला सशक्त झाल्या तर कुटुंब सशक्त होते, समाज सशक्त होतो आणि देशही सशक्त होतो असे मत प्रोफेसर डॉ. विशाला शर्मा यांनी व्यक्त केले. त्या शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी अध्यक्षीय मनोगतातून भारतात होऊन गेलेल्या महान स्त्रियांच्या प्रेरणा घेऊन त्यांचे स्मरण करून महिलांनी मार्गक्रमण केले पाहिजे फक्त चूल आणि मुल यामध्येच न राहता छोट्या छोट्या उद्योगास सुरवात करायला हवी असे मत मांडले. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. आशा वडणे यांनी केले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब अडसरे, डॉ. छाया भालशंकर, डॉ. पांडुरंग कांबळे व मोठ्या संख्येने महाविद्यालयातील महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शालिनी फलके व मोहिनी जाधव यांनी केले तर आभार प्रा. मिनाक्षी चक्रे यांनी मानले.

शेवगाव : विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासूनच अर्थार्जन करायला शिकले पाहिजे. प्रत्येक महिलेने छोट्या उद्योगातून कुटुंबाच्या आणि समाजाच्या विकासात भर पडली पाहिजे. आजच्या स्त्रीमध्ये प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचे सामर्थ्य, शक्ती आहे. २०४७ मधील भारतात महिलांना समान संधी, सुरक्षित वातावरण आणि सन्मान मिळेल. महिला सशक्त झाल्या तर कुटुंब सशक्त होते, समाज सशक्त होतो आणि देशही सशक्त होतो असे मत प्रोफेसर डॉ. विशाला शर्मा यांनी व्यक्त केले.
त्या शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी अध्यक्षीय मनोगतातून भारतात होऊन गेलेल्या महान स्त्रियांच्या प्रेरणा घेऊन त्यांचे स्मरण करून महिलांनी मार्गक्रमण केले पाहिजे फक्त चूल आणि मुल यामध्येच न राहता छोट्या छोट्या उद्योगास सुरवात करायला हवी असे मत मांडले. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. आशा वडणे यांनी केले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब अडसरे, डॉ. छाया भालशंकर, डॉ. पांडुरंग कांबळे व मोठ्या संख्येने महाविद्यालयातील महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शालिनी फलके व मोहिनी जाधव यांनी केले तर आभार प्रा. मिनाक्षी चक्रे यांनी मानले.

COMMENTS