Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला नाचवायच्या नसून वाचवायच्या ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः दहीहंडी उत्सवानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज

नागरिकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन
सदगुरू शुक्राचार्य मंदिरामुळे कोपरगावची ओळख ः विवेक कोल्हे
जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचा विवेक कोल्हेंना पाठिंबा

कोपरगाव तालुका ः दहीहंडी उत्सवानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी पार पडली. मोठ्या संख्येने कोपरगाव शहर आणि तालुक्यातून गोविंदा पथक व नागरिकांनी हजेरी लावली.हजारो नागरिकांनी तुडुंब गर्दी करून गोविंदांना प्रोत्साहन देत होते हे क्षण अविस्मरणीय आनंद देणारे ठरले.
सतत सामाजिक संदेश देणारे संजीवनी युवा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवात देखील वेगळेपण सिद्ध केले आहे. महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून रांझे गावच्या बाबजी गुजरचे हात पाय कलम करण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी दिली होती तो प्रसंग हुबेहूब साकारला गेला. दहीहंडी स्त्री संरक्षणाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अशी थीम घेण्यात आली होती. महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत या आशयाचे फलक युवकांनी झळकावले. त्यावर भाष्य करताना विवेक कोल्हे यांनी महिलांचा आदर करणारे युवक घडवणे हे आपले ध्येय आहे.ज्यावेळी कौरव पांडव यांच्या युद्धात योग्य मार्गदर्शक पांडवांच्या बाजूने श्रीकृष्णाच्या रूपाने होता. त्यामुळे असे उत्सव साजरे करताना आपण योग्य आदर्श मिळणारे केंद्र शोधणे आपले जीवन नक्कीच बदलते. संजीवनी युवा प्रतिष्ठान हे नेहमीच आदर्श उपक्रम राबवते.या वेळी कुठली सिने कलाकार न बोलवता मंजूर येथे गोदावरीत वाहून जाणार्‍या युवकांना वाचविण्यासाठी आपली साडी पाण्यात फेकणार्‍या ताईबाई पवार यांना निमंत्रित करून सत्कार करण्यात आला त्याच आजच्या सेलीब्रेटी आहेत असे म्हणताच गोविंदा पथकांनी एकच जल्लोष केला.दहीहंडी यशस्वी करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवासेवक आणि उत्सव समितीचे कोल्हे यांनी कौतुक केले. अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्न करून दहीहंडी फुटली नाही त्यामुळे काही उंची कमी करून सर्व पथकांनी मिळून दहीहंडी फोडली.या दहीहंडीचे बक्षीस सर्वांना विभागून देण्यात आले.स्वतः विवेकभैय्या कोल्हे यांनी तिसर्‍या थरावर जाऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला यामुळे सर्वांनी कौतुकाने टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी विविध संस्था,संघटनाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, गोविंदा पथक, नागरिक, महिला भगिनी आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक उपस्थित होते.

COMMENTS