बीड प्रतिनिधी- कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर याप्रमाणे बीड शहरातील अनेक भागात घरे बांधून समाज बांधव कुटुंबासहित वास्तव्य करीत आहेत. तसेच बीड
बीड प्रतिनिधी- कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर याप्रमाणे बीड शहरातील अनेक भागात घरे बांधून समाज बांधव कुटुंबासहित वास्तव्य करीत आहेत. तसेच बीड तालुक्यातील गायरान धारक जमिनी कसून आपली उपजिविका भागवीत आहेत. परंतु पंजाब न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेऊन बीड शहरातील घर धारकांना व तालुक्यातील गायरान धारकांना नोटीसा देऊन त्यांना घरापासून जमिनीपासून वंचित करण्याचे काम राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. त्यांना देण्यात आलेल्या नोटीसा रद्द करून अन्यायकारक निर्णय मागे घेण्यासाठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथारिपाइंचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.20) जून मंगळवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात अक्षय भालेराव यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. गायरान धारकांना व घर धारकांना देण्यात आलेल्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात. सन 1990 च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याचा शासन निर्णयाची 2005 पर्यंत मुद्दत वाढ करण्यात यावी. अशी मागणी शासन दरबारी करण्यासाठी रिपाइंच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात महिलांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन रिपाइं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायाताई मिसळे, रेशमाताई जोगदंड, आठवले ताई, संगीता जाधव, अरुणा निर्मळ, छाया वाघमारे, मंगल वाघमारे, मंगल जाधव, रेखा मिसळे, कुसुम मिसळे, ढोबळे ताई, मनीषा साळवे, मनीषा यादव, संगीता गायकवाड, माया वाघमारे, उषा सोनकांबळे,जमुना काळे,ललिता कपाडे, जयश्री जाधव,सवाई ताई, अनिता तुरुमारे आदींनी केले आहे.
COMMENTS