Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रियंका शिंदे यांना महिला लिडर बिझनेस पुरस्कार

सुपे/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील राहुल शिंदे (पाटील) याची सुविद्या पत्नी प्रियंकाताई राहुल शिंदे (पाटील) यांना महिला लिडर

उक्कडगावमध्ये मुंजोबा विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण
आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर जिल्हा परिषद शाळेला खुर्च्या भेट
LOK News 24 दखल; अहमदनगर महापालिकेच्या अमृत योजनेचे पैसे थकले l LokNews24

सुपे/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील राहुल शिंदे (पाटील) याची सुविद्या पत्नी प्रियंकाताई राहुल शिंदे (पाटील) यांना महिला लिडर बिझनेस अ‍ॅवार्डने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आहे. उच्चशिक्षित इंजिनियर आणि छत्तीसगडमधील प्रशासकिय कामाचा चांगला अनुभव असल्याने विवाह झाल्यानंतर आपले घर प्रपंच सांभाळून त्यांनी स्वतःचा फर्निचर तयार करण्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुपा एमआयडीसीमधे वर्ल्ड ऑफ वूड नावाने कारखाना चालु केला. कारखान्यामधे ओरिजनल सागवान इम्पोटेड रबर वुड लाकडापासुन स्टाईलमधे नवीन, नवीन डिझायनर फर्निचर बनवले जाते. उत्तम गुणवत्ता ग्राहकभिमुक सेवा दिली जाते. मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे अल्पावधित त्यांच्या कामास ग्राहकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आज त्यांची उलाढाल करोडो रुपयामधे झाली आहे. पुरस्काराबद्दल चित्रा वाघ (अध्यक्षा महिला भाजप), शालिनीताई विखे (माजी जि.प.अध्यक्षा ), प्रितीताई साबख े(सरपंच रांजणगाव)आणी पारनेर तालुक्यातील महिलांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS