Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने आमरण उपोषण घेतले माघार

’येत्या दहा ते पंधरा दिवसात निर्णय न लागल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल’

मुक्रमाबाद प्रतिनिधी - लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मन्मथअप्पा खंकरे यांच्या नेतृत्वाखाली मुक्रमाबाद येथे

दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट
विविध समाजाच्या वतीने आयोजित सामाजिक सलोख्याची समतेची मिसळ
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्रमाबाद प्रतिनिधी – लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मन्मथअप्पा खंकरे यांच्या नेतृत्वाखाली मुक्रमाबाद येथे दि.8 पासून सुरु असलेले बेमुदत उपोषण  मंगळवार दि. 9 रोजी तहसीलदार मुखेड यांनी आपल्या मागण्या उपजिल्हाधिकार्‍या मार्फत वरिष्ठांकडे पाठवून अडचणी दुर करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन नंतर  दुसर्‍या दिवशी उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
दि.4 मे रोजी जिल्हाधिकार्‍यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात गाव निहाय समिती स्थापन करून प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले होते.लेंडी प्रकल्पात जात असलेल्या मुक्रमाबाद येथील 1310 बाधीत मुळ कुटुंबातील धरणग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी शासन देत असलेल्या तोकड्या स्वरूपाच्या मावेजा फेरबदल करून सात लाख रुपये द्यावेत व पुनर्वसन करावे, लेंडी प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकर्‍या द्यावे व सर्व समाजासाठी स्मशान भूमी उपलब्ध करून द्यावी. याप्रमुख  मागणीसाठी मुक्रमाबाद येथील बस स्थानक येथे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मन्मथ खंकरे व मनान शेख या दोघांनी आमरण उपोषण सुरू केले होते. महसूल विभागाचे तलाठी मारुती श्रीरामे यांनी तहसीलदाराचे पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर सदरील उपोषण मागे घेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक गजानन कागंणे व तलाठी मारुती श्रीराम यांनी उपोषणकर्त्याना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडले  यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे, हेमंत खंकरे, बाबा सय्यद,सय्यद जलालोद्दीन यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

COMMENTS