जामखेड ः गणेशोत्सवाच्या निमित्ताने महासंग्राम युवा मंचच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगा

जामखेड ः गणेशोत्सवाच्या निमित्ताने महासंग्राम युवा मंचच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने 13 सप्टेंबर रोजी जामखेड शहरातील संविधान सर्कल येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 119 बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते गणेशमूर्तीचे पूजन करून रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ, प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्ष कर्जत नामदेवा राऊत, सभापती शरद कारले, सावतापरिषद तालुकाध्यक्ष सोमनाथ राऊत, संध्याताई सोनवणे, तात्याराम पोकळे, बाजीराव गोपाळघरे, संतोष गव्हाळे, पवन राळेभात, मोहन पवार, राजेश वाव्हळ, डॉ. अल्ताफ शेख, अर्जुन म्हेत्रे, गोरख घनवट, कैलास माने, देवीदास भादलकर पै राजू शेख, अमित जाधव, संतोष मोहळकर, गणेश काळे, रामदास निमोणकर, देविदास भादलकर, सावता हजारे, पांडुरंग मोरे, मनोज वराट, अतुल जगताप, युवराज राऊत, विकास राऊत, निलेश बिराजदार, बबलू निमोणकर, डिगंबर म्हेत्रे, सोमनाथ निमोणकर, राम राऊत, अक्षय म्हेत्रे, अमर निमोणकर, माऊली निमोणकर आणि सर्व महासंग्राम युवा मंच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. तालुक्यातील युवकांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन रक्तदान केले. स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात दिवसेंदिवस वाढणारे अपघात व इतर आजारामुळे रक्त ही आरोग्य सेवेतील आवश्यक उपचार प्रणाली झालेली आहे. काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गणपती बाप्पा च्या आशिर्वादाने व महासंग्राम युवा मंचच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गोरगरीब, गरजू लोकांची या उपक्रमातून सेवा करण्याची संधी मिळते. असे माजी उपनगराध्यक्ष महासंग्राम युवा मंचचे अध्यक्ष महेश निमोणकर यांनी सांगितले.
COMMENTS