भूत उतरविण्याच्या नावाखाली मांत्रिकाचा अत्याचार

Homeताज्या बातम्यादेश

भूत उतरविण्याच्या नावाखाली मांत्रिकाचा अत्याचार

मंत्र म्हणता-म्हणता शिक्षिकेसोबत केले दुष्कर्म

भोपाळ प्रतिनिधी  - मध्य प्रदेशात( Madhya Pradesh) एका तांत्रिकाने शिक्षिकेसोबत अनेकवेळा बलात्कार  केल्याची घटना समोर आली आहे. भूत उतरविण्याच्या नावा

पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर ?
क्षेत्र महाबळेश्‍वर येथे कोरड्या विहिरीत पडला रानगवा

भोपाळ प्रतिनिधी  – मध्य प्रदेशात( Madhya Pradesh) एका तांत्रिकाने शिक्षिकेसोबत अनेकवेळा बलात्कार  केल्याची घटना समोर आली आहे. भूत उतरविण्याच्या नावाखाली तो  अनेक वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर कथित तांत्रिकाने झपाटलेल्या भूतापासून मुक्ती देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली. तांत्रिकाने शिक्षिकेला सांगितले की तुमच्या शरीरात भूत आहे. यासाठी शरीर शुद्ध करावे लागेल. शारीरिक संबंध करून मंत्रांचे पठण केले जाईल. पीडितेने सांगितले की माझे मन हरपले जायचे. यादरम्यान त्याने अनेकवेळा बलात्कार केला. शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार तांत्रिकाच्या शोधात पोलीस सतत छापेमारी करत आहेत.

COMMENTS