वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून

तपासासाठी पोलीस पथके रवाना

नांदेड प्रतिनिधी / नांदेड मध्ये  वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याने खळबळ उडाली. शहरातील ढवळे काॅर्नर परिसरात येथे काल रात्र

राहुरी तालुक्यातील वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून खून
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा चिरून हत्या
जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या

नांदेड प्रतिनिधी / नांदेड मध्ये  वाईन शॉप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याने खळबळ उडाली. शहरातील ढवळे काॅर्नर परिसरात येथे काल रात्री ही घटना घडली. माधव जीवनराव वाकोरे असं खुन झालेल्या व्यवस्थापकाच नाव आहे. दारुच्या पैश्याच्या कारणावरुन काही तरुणांसोबत वाईन शाॅपचे व्यवस्थापक माधव वाकोरेचा वाद झाला. त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा तरुणांचे टोळके वाईन शाॅपवर आले आणि वाकोरे यांना मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले. जखमी वाकोरे ला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मारेकरांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मारेकऱ्यां च्या तपासात पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी एकूण सहा आरोपी असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उर्वरित तीन आरोपींचा शोध घेणे चालू आहे अशी माहिती  ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय अशोक भोरबांड यांनी दिली.

COMMENTS