Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मैत्र ग्रुपला सोबत घेत भविष्यात होतकरू लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार:- प्रशांत शेळके

पाथर्डी प्रतिनिधी - मैत्र जीवांचे या ग्रुपच्या सुनील चोरडिया,गंगाधर सत्वधर यांच्या मित्रमंडळाकडून तसेच प्रशांत शेळके यांच्या संकल्पनेतून पाथर्डी

मनोज जारांगे यांच्या उपोषणाला निमगाव को. ग्रामस्थांचा पाठिंबा
भविष्य सांगणार्‍या पोलिसाचेच…भविष्य अंधारात
अहमदनगर मध्ये एका दिवसात कोरोनाचे ३५९२ नवे रुग्ण आढळले

पाथर्डी प्रतिनिधी – मैत्र जीवांचे या ग्रुपच्या सुनील चोरडिया,गंगाधर सत्वधर यांच्या मित्रमंडळाकडून तसेच प्रशांत शेळके यांच्या संकल्पनेतून पाथर्डी शहरातील इंदिरानगर येथील अशोक नारायण करपे या होतकरु व्यक्तीला शनिवारी तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. पुणे येथील मैत्री ग्रुपचे सदस्य बाहेती सर,जैन संघटनेचे अध्यक्ष श्री विश्वजीत गुगळे,प्राचार्य सुभाष खेडकर,माजी नगरसेवक प्रसाद आव्हाड,प्रा. रमेश मोरगावकर,सुनील शेटे,संतोष चोरडिया यांच्या उपस्थितीत देण्यात आली.

प्रशांत शेळके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत अपंगत्व बाजूला ठेवत जिद्दीने उभा राहणाऱ्या करपे यांना प्रोत्साहन देण्याचे काम केल्याने त्यांच्या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. पुणे येथील मैत्र जीवांचे ग्रुप मधील सर्व सदस्यांना सोबत घेत भविष्यात अपंग व्यक्तींना शासकीय योजनाचा लाभ मिळवण्यासाठी,गरजवंताना छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचा मानस या यावेळी प्रशांत शेळके यांनी बोलून दाखवला.

COMMENTS