मुंबई ः काँगे्रसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये डेरेदाखल झाल्यानंतर काँगे्रसमधील खदखद बाहेर पडतांना दिसून येत आहे. नाना पटोले यांच्याविषय

मुंबई ः काँगे्रसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये डेरेदाखल झाल्यानंतर काँगे्रसमधील खदखद बाहेर पडतांना दिसून येत आहे. नाना पटोले यांच्याविषयी अनेकांचा तक्रारीचा सूर असल्यामुळे आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, त्यामुळे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रदेश काँगे्रसमध्ये फेरबदल होण्याची चर्चा असून, काँगे्रसचे अनुभवी नेते बाळासाहेब थोरात काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष होवू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
सद्यस्थितीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी सातत्याने काँग्रेसमध्ये संयमी नेते म्हणून ओळखल्या जाणार्या बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी थोरात यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठी सातत्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत. थोरात यांच्यावरच आता काँग्रेसमधील पडझडीला ब्रेक लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे त्यांची नाना पटोले यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल अशी चर्चा रंगली आहे.
काँगे्रसच्या प्रभारींनी घेतली शरद पवारांची भेट – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासह राज्यातल्या प्रमुख काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान आगामी काळात होणार्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या सोबतच काँग्रेस मधील आणखी काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत देखील महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली, अशीही माहिती सुत्रांनी दिली.
COMMENTS