Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमावादाचा प्रश्‍न निघणार निकाली ?

’मविआ’च्या नेत्यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट

नवी दिल्ली प्रतिनिधी - सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावर

जिल्हा बँकेत सुरू…श्रेयाचे भांडण
रोजगार निर्मितीसाठी भारताला 8 टक्के वाढ आवश्यक
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा चिरून हत्या

नवी दिल्ली प्रतिनिधी – सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदावरून हटवावे, या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भेटीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली. अमित शाह हे येत्या 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खासदारांनी दिली.


गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर परस्पर समन्वयाने तोडगा काढू असे आश्‍वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे कोल्हे यांनी सांगितले. डॉ. कोल्हे म्हणाले, सीमाभागातील नागरिक 1956 पासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कर्नाटक सरकारकडून त्यांच्यावर अत्याचाराचा वरंवटा फिरवला जात आहे. आताही सीमाभागातील नागरिकांवर अत्याचार केला जात आहे. हे सर्व गृहमंत्री अमित शहा यांनी समजून घेतले आहे. ते लवकरच या वादावर तोडगा काढतील , असा विश्‍वास आहे. सीमावादाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने वक्तव्य केली जात असल्याचे कोल्हे म्हणाले. महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले जात आहेत. तसेच राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये येण्यापासून रोखले जात आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार देशात कुठेही जाण्याचा हक्क आहे. याला अडकाठी केली जात आहे. याबाबतच्या सर्व तक्रारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली. अमित शाह यांनी खासदारांची बाजू संवेदनशीलपणे एकूण घेतल्यामुळे त्यांचे अमोल कोल्हे यांनी त्यांचे आभार मानले. बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर या सगळ्या सीमाभागात आपला मराठी बांधव आहे. या मराठी बांधवांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवला जात आहे. या सर्वांवर कधीतरी चाप बसेल अशी अपेक्षा असल्याचे कोल्हे यावेळी म्हणाले. काल गृहमंत्री अमित शाह यांची भेटीची वेळ मागितली होती. पण त्यांच्या व्यस्त कामामुळे काल भेट झाली नाही. पण आज त्यांनी वेळ दिली होती. त्याप्रमाणं आम्ही त्यांची भेट घेतल्याचे कोल्हे यावेळी म्हणाले. आपल्या मातीचा आपल्या राज्याचा विषय आहे. त्या विषयावर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन राज्याच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. इतर राज्यातील खासदार देखील पक्षीय मतभेद विसरुन एकत्र येतात. मग या सीमावादाच्या प्रश्‍नावेळी सर्व खासदार एकत्र यायला हवे होते अशी अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली.

दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केंद्रीय गृहमंत्री करणार चर्चा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्‍नासंदर्भात कर्नाटक सरकारकडून सातत्याने ज्या गोष्टी होत आहे. सीमाभागात मराठी बांधवांची जी गळचेपी होत आहे. याबाबत आम्ही चर्चा केली. अमित शहा यांनी येत्या 14 तारखेला दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. तसेच सीमावाद लवकरात लवकर सोडवला जाईल असे आश्‍वासन दिले.

COMMENTS