Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटकात काँगे्रसचे सरकार कोसळणार ?

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा दावा

बंगळुरू ः कर्नाटकामध्ये काँगे्रसचे सरकार असून, हे सरकार कधीही कोसळू शकते, असा गौप्यस्फोट जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस

लस, इंजेक्शन व ऑक्सिजन…जिल्ह्यात खडखडाट ; आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत
आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर ः ढाकणे
धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांची महापूजा रोखू

बंगळुरू ः कर्नाटकामध्ये काँगे्रसचे सरकार असून, हे सरकार कधीही कोसळू शकते, असा गौप्यस्फोट जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. कुमारस्वामी यांनी दावा केला की, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील एक प्रभावशाली काँग्रेस मंत्री 50-60 आमदारांसह पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होऊ शकतो. जेडीएस नेते म्हणाले, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये सर्व काही ठीक नाही. हे सरकार कधी पडेल माहीत नाही. एक प्रभावशाली मंत्री आपल्यावरील खटले टाळण्यासाठी हतबल झाला आहे. केंद्राने त्यांच्यावर असे खटले दाखल केले आहेत, ज्यात ते वाचण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर कधीही घडू शकते, तर कर्नाटकातही काहीही अशक्य नाही, असे ते म्हणाले. त्यांना त्या प्रभावशाली नेत्याचे नाव विचारले असता, छोट्या नेत्यांकडून अशा पावलाची अपेक्षा करता येत नाही, प्रभावशाली नेतेच ही पावले उचलतील, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

COMMENTS