Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेतील ‘प्रशासकराज’ कारवाईचा बडगा उगारणार का ?

ओढ्या-नाल्यांवरील नैसर्गिक प्रवाह खुले करण्याची तीव्रता लक्षात घेईल कोण ?

डॉ. अशोक सोनवणे ःअहमदनगर ः महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे महापालिकेत आता प्रशासकराज सुुरू झाले आहे. त्यामुळे प्रशासक या नात्याने आय

नागरी प्रश्‍न सोडविण्यात महापालिकेला अपयश का ?
नगर विकासासाठी महापालिका घेणार तीनशे कोटीचे कर्ज
ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पहिला आठवडा कधी उजाडणार ?

डॉ. अशोक सोनवणे ः
अहमदनगर ः महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे महापालिकेत आता प्रशासकराज सुुरू झाले आहे. त्यामुळे प्रशासक या नात्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना अहमदनगरपालिकेतील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्याची, आणि अर्थपूर्ण संबंध जोपासणार्‍या नगररचना विभागातील बड्या अधिकार्‍यांना ताळ्यावर आणण्याची नामी संधी आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पालिकेने कायनेटीक चौकातील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पालिकेचे पाऊल पुढे पडतांना दिसून येत आहे. मात्र शहरातील तब्बल 41 ओढ्या-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह बंद करून, त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. त्यामुळे शहरातील सावेडी, शहरातील मध्य भाग, केडगाव उपनगरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले आहे. नगर शहरात सीना नदीसह ओढे- नाले मिळून 41 नैसर्गिक प्रवाहांचे मनपाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहर हद्दीतून वाहणार्‍या या ओढ्या-नाल्यांची एकूण लांबी 83.63 किमी आहे. यापैकी 8.23 किमी लांबीच्या अंतरातील ओढे-नाले सिमेंटचे पाईप टाकून भूमिगत करण्यात आले आहेत. अजूनही या ओढ्या नाल्यांच्या हद्दी कायम करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे शहरातील ओढ्या नाल्यातील अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर असला तरी, त्याचे सोयरसुतक ना महापालिकेला आहे, ना नगररचना विभागाला आहे. शहरातील संबंधित अतिक्रमणे, पाईप टाकलेली ठिकाणे, नैसर्गिक प्रवाह बदललेल्या ठिकाणांची स्थळ पाहणी करून अहवाल देण्याचेही आदेश जिल्हाधिकार्‍यांनी महापालिकेला दिले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून महापालिकेकडून पाहणीचा फास सुरू आहे. महापालिकेने अतिक्रमणधारक 118 जणांची अपूर्ण आणि कच्ची यादी केली असली तरी, त्यासंदर्भातील अहवाल अजूनही महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेला नाही.

अतिक्रमणाबाबत महापालिका अनभिज्ञ कशी ? – ओढ्या नाल्यावरील अतिक्रमणाची गुरूवारी 11 जानेवारी 2024 रोजी पाहणी करण्यात आली होती. या पाहणी विद्यानगर, अरणगाव रोड, रेल्वे क्रोसिंग पुलाजवळील ओढाजवळ करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यानगर, अरणगाव रोड, रेल्वे क्रोसिंग पुलाजवळील ओढ्याला समांतर भिंत बांधली गेली आहे. पुढे सातपुते मळा, केडगाव, भूषणनगर स्टॉपसमोर, आई.सी.टी.येथे मागे बिल्डरने पाइप टाकुन ओढा बंदीस्त केला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणण्यानुसार तो पाइप खाजगी प्लॉट धारकाने टाकला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आमच्या येथे तुंबते. पुढे जय मल्हार लॉन रोड, भूषणनगर येथे नाल्यावरच स्लॅबचे बांधकाम सुरू आहे. रेल्वे क्रोसिंग पुलाजवळील ओढ्याला समांतर भिंत कुणी बांधली, या बद्दल महानगर पालिकेचे नगररचना विभागाचे अधिकारी अनभिज्ञ आहेत की, तसा आव आणत आहेत, याबाबत मतभिन्नता असली तरी, महापालिका ही भिंत पाडण्याचे धाडस कधी दाखवणार, कारवाईचा बडगा कधी उगारणार असाच सवाल उपस्थित होत आहे.

COMMENTS