अहिल्यानगर : जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी जिल्हा परिषद
अहिल्यानगर : जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या संभाव्य पक्षबदलामुळे शिवसेनेचा जिल्ह्यातील प्रभाव आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईत शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्यासह सुजित झावरे यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS