Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा देणार : ना. अजित पवार

मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात व विकासात सांगली जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. मात्र, अलीकडील काळात सांगली जिल्ह्याला योग्य नेतृत्व न मिळ

बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार : ना. अजित पवार यांची माहिती
येलूर ग्रामपंचायत बिनविरोध : महाडीक गटाला सरपंच पद
लाल महालात चित्रीकरण करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करा : खा. उदयनराजे

मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात व विकासात सांगली जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. मात्र, अलीकडील काळात सांगली जिल्ह्याला योग्य नेतृत्व न मिळाल्याने हा जिल्हा विकासापासून वंचित राहीला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार महाराष्ट्रातील जनता स्विकारताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा देत रखडलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याची घोषणा ना. अजित पवार यांनी केली.
सांगली जिल्ह्यातील माजी आमदार, माजी मंत्री व विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई येथे ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे हे होते. यावेळी खा. प्रफुल्य पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी खा. सुनिल तटकरे व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वागत व प्रास्थाविक निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत माजी राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम शिवाजीराव नाईक, माजी आमदार व सांगली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव जगताप, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगली जिल्हा बँकचे माजी उपाध्यक्ष रणधीर शिवाजीराव नाईक, सांगली जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौंडा ईश्‍वरप्पा रवि पाटील, आटपाडी येथील भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीणचे माजी अध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील, संग्राम जगताप, पलूस येथील स्वाभिमानी विकास आघाडीचे युवा नेते व संग्राम उद्योग समुहाचे अध्यक्ष निलेश बापुसो येसुगडे, सांगली काँग्रेस शहर अध्यक्ष मुन्ना कुरणे यांच्यासह जिल्ह्यातील शिराळा, जत, खानापूर आटपाडी, पलूस कडेगांव, इस्लामपूर, सांगली शहर या विधानसभा मतदार संघातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

COMMENTS