Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा निवडणूक लढणार ः चंद्रकांत खैरे

छ.संभाजीनगर ः लोकसभा निवडणुकीच्या अतितटीच्या लढतीत विजय संपादन न करू शकणार्‍या ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी विधानसभेसाठ

औरंगाबाद मध्ये विहिरीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू
जालना रोड राहणार सात तास बंद
औरंगाबाद शहरातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल मध्ये घेण्यात आला मॉकडिल

छ.संभाजीनगर ः लोकसभा निवडणुकीच्या अतितटीच्या लढतीत विजय संपादन न करू शकणार्‍या ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला. आगामी विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पश्‍चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास चंद्रकांत खैरे इच्छुक असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास पश्‍चिममधून मी निवडणूक लढवणार, मला गद्दारांना पाडायचे आहे. असा निर्धारही चंद्रकांत खैरेंनी केला आहे. त्यामुळे आता खैरेंच्या छत्रपती संभाजीनगर मधून लढण्याबाबतच्या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS