Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रसला ‘बळ’ मिळेल का ?

सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक वर्षांची पार्श्‍वभूमी असलेला पक्ष म्हणजे काँगे्रस. काँगे्रसची मुळं ही तळागाळापर्यंत रूजलेली आणि वाढलेली होती. मात्र प्र

लोकशाहीचा उत्सव आणि मतदारांचा उत्साह
तामिळनाडू आणि राज्यपालांचा संघर्ष
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून वादंग

सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक वर्षांची पार्श्‍वभूमी असलेला पक्ष म्हणजे काँगे्रस. काँगे्रसची मुळं ही तळागाळापर्यंत रूजलेली आणि वाढलेली होती. मात्र प्रथमच 2014 मध्ये या पक्षाचा सपशेल पराभव पत्कारावा लागला. हा पराभव इतका मोठा होता की, 2014 ते 2019 या पाच वर्षांमध्ये काँगे्रस या पराभवातून सावरू शकलेली नाही. खरंतर यश-अपयश कोणत्याही पक्षाला येत असते. जनतेची ती लाट असते. इंदिरा गांधींना देखील पराभवाची चव चाखावी लागली. मात्र त्या पराभवातून इंदिरा गांधी सावरून लगेच जनतेत गेल्या. त्यांनी देशातील संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि पुन्हा एकदा जनमत मिळवत सत्तेवर आल्या तेही काही वर्षांमध्ये. असे असतांना, काँगे्रस पक्ष जो तळागाळापर्यंत रूजलेला होता, त्या पक्षाची आज काय अवस्था झालेली आहे, काँगे्रसच्या छावणीत आज अनेक पक्ष मोठे झालेले दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काँगे्रसला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाने 2014 पासूनच कृती कार्यक्रम आखण्याची गरज होती. मात्र सत्ता गेल्यानंतर काँग्रेस पक्ष बिथरला. आणि त्या पक्षातील लोकनेत्यांनी इतरत्र लक्ष वळवले. त्यांची जनतेतील पकड आणखी ढिली होवू लागली. त्यामुळे काँगे्रस सातत्याने पराभवाच्या छायेत जातांना दिसून येत आहे. खरंतर भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसने ज्या त्वेषाने लढायला हवे होते, त्या त्वेषाने काँगे्रस लढतांना दिसून आला नाही. त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांमध्ये काँगे्रसने तोेंड उघडण्याऐवजी तपासयंत्रणा आपलं काम करू लागली. परिणामी काँगे्रस बॅकफूटवर जातांना दिसून आली. मणिूपरमधील घटनांचे काँगे्रस सारख्या पक्षांना मोठं भांडवल करता आलं असते, मात्र त्यातुलनेत काँगे्रस तिथे कमीच पडली असेच म्हणावे लागेल.

काँगे्रसने आपली भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून सुरूवात केली असली तरी, या राज्यात काँगे्रसला कितपत फायदा मिळेल हा प्रश्‍नच आहे. काँगे्रसला या यात्रेतून कितपत फायदा होईल, हा प्रश्‍न आहे. मात्र यासोबतच काँगे्रसला प्रभावी प्रचार पद्धती राबवावी लागणार आहे. आक्रमक पद्धतीवरच काँगे्रसला विजय मिळू शकतो. कारण हातात असलेली राज्ये गमावून बसतांना दिसून येत आहे. अशावेळी काँगे्रसला काही प्रमाणात भारत जोडो यात्रेने एक बळ दिले. राहुल गांधींनी ज्या त्वेषेने पायी यात्रा केली, त्या यात्रेला तोड नव्हती. मात्र त्याचा फायदा काँगे्रसला काही दिवसांपूर्वी पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत दिसून आलेला नाही. यानंतर काँगे्रसने नुकतीच आपली भारत न्याय जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. यातून काँगे्रस तळागाळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. त्यामुळे या यात्रेतून काँगे्रसला बळ मिळेल का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. आगामी काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने भाजपने आपली पूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे, त्या तुलनेत इतर पक्ष कुठेच दिसून येत नाही. इंडिया आघाडी घटक पक्षांना सोबत घेवून निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे, त्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडी किती जागा मिळवते, यावर बरेच गणित अवलंबून असणार आहे. काँगे्रस यंदा तरी लोकसभा निवडणुकीत शतक ओलांडेल का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. काँगे्रसने 100 जागा जरी मिळवल्या आणि मित्रपक्षांनी 150 जागा मिळवल्या तरी भाजपसमोर आव्हान उभे राहू शकते. वास्तविक पाहता त्यासाठी काँगे्रसला सुक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. भाजप आगामी निवडणुकीत ज्या पद्धतीने नवे चेहरे देत आपल्या धक्कातंत्रांचा परिचय देत आहे, त्यापद्धतीने काँगे्रसने देखील नाविण्यपूर्ण प्रयोग राजकारणात राबवण्याची खरी गरज आहे. अन्यथा काँगे्रस आपल्या जागा वाढवू शकणार नाही.  

COMMENTS