Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रोत्साहन निधीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार – विधानपरिषद आमदार सुनिल शिंदे

पाथर्डी प्रतिनिधी - पाथर्डी तालुक्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन पर निधी पासून अजूनही काही शेतकरी वंचित असून

राहुरी शहरात नवरात्रोत्सव उत्साहात
व्यापार्‍यांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार
घायतडकर दाम्पत्याचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोलाचे – पोलिस निरीक्षक देसले

पाथर्डी प्रतिनिधी – पाथर्डी तालुक्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन पर निधी पासून अजूनही काही शेतकरी वंचित असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात आक्रमक भूमिका घेतली जाईल. सध्याचे पदाधिकारी चांगले काम करत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले.तसेच

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आघाडी घेण्यासाठी चाचपणी केली जाईल.तालुक्यातील टाकळीमानूर गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दहा शाखेचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर तालुका प्रमुख भगवानराव दराडे यांच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे बोलत होते.यावेळी अहमदनगर दक्षिणचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,अशोकराव गायकवाड,भाऊसाहेब धस आदी जण उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार शिंदे यांनी म्हटले की,भविष्यात सध्याच्या परिस्थितीत कार्यकर्त्याशी संवाद साधून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून विविध भागात कार्यकर्त्यांचे बांधणी करत संघटन करण्याकडे माझे लक्ष आहे.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुक ही त्यावेळीच्या परिस्थितीवर अवलंबून राहील.त्यावर सध्या तरी भाष्य करणे योग्य नाही.सध्या तरी राज्यपातळीवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर जात आहोत.कुठेही कटुता येऊ नये म्हणून स्थानिक परिस्थितीवर निर्णय घेतले जातील.

जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी बोलताना म्हटले की,बऱ्याच दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात शाखेचे उदघाटन करण्याचे नियोजन होते.तालुका प्रमुख भगवानराव दराडे यांचा जनसंपर्क चांगला असून ते उत्तम काम करत आहेत.भविष्यात ५० शाखेचे उदघाटन करण्याचे आमचे नियोजन आहे.शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाथर्डी शहराला व तालुक्याला जास्तीत जास्त निधी तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांना मदत मिळवून देत सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.कार्यकर्त्यांच्या मागणीवरून विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्याची मागणी करावी.

ग्रामीण भागातील जनतेची नाळ आजही उद्धव साहेबांशी जोडली गेलेली असून आजही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबतच आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेणे गरजेचे असताना पराभवाची भीती वाटत असल्याने न्यायालयात जाऊन विलंब करून वेळ मारून नेण्याचे काम राज्यकर्ते करत आहेत.ही वास्तव परिस्थिती असून मागणी करूनही निवडणूका घेतल्या जात नाहीत.हे योग्य नाही असे मत अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

COMMENTS