मुंबई ः महाविकास आघाडीला अजूनही हादरे बसू शकतात, तसे संकेतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. इंडिया आघाडीला गळती लागल्यान

मुंबई ः महाविकास आघाडीला अजूनही हादरे बसू शकतात, तसे संकेतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. इंडिया आघाडीला गळती लागल्यानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला देखील हादरे बसतांना दिसून येत आहे. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आघाडीला मोठे धक्के बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी, माजी खासदार मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांनी अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट यांनी भाजपची सोबत घेणे पसंद केले आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँगे्रस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, त्यादिशेने दोन्ही नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर बोलतांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. मोदींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारत संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येण्याची तयारी करत आहेत. काहीजण तयारीत आहेत. परंतु, तुम्हा पत्रकारांकडे असलेली माहिती माझ्याकडे नाही. परंतु कधीही काहीही होऊ शकते. मोदींना साथ देण्यासाठी कोणीही आमच्याकडे येऊ शकते. जयंत पाटील यांच्याबाबत उडत असलेल्या अफवेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, जयंत पाटील आणि माझी कुठेही, कसलीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्क केलेला नाही. किंवा त्यांचे माझ्याशी काही बोलणे झालेले नाही. या कदाचित कपोकल्पित बातम्या असतील. तरीही पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी आमच्याकडे कोणीही येऊ शकते. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, मोदींनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. त्यांच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कोणी भाजपात येणार असेल तर आमचा दुपट्टा त्यांच्यासाठी तयार आहे. आम्ही कोणालाही आमच्या पक्षात घेण्यासाठी तयार आहोत. आमच्याकडे जागा आहे. त्यामुळे आम्ही कोणलाही नाही म्हणणार नाही. आमच्या विचारधारेवर पक्षात जी काम करण्याची पद्धत आहे, त्या विचारधारेला अनुसरून काम करावे लागते. त्यासाठी कोणीही पक्षात आले तर आम्ही त्याचे स्वागत करू. जयंत पाटील यांनी भाजपामधील वरिष्ठांशी संपर्क केला आहे का? असा प्रश्न विचारल्यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, मला याबद्दल माहिती नाही. परंतु, कुठल्याही नेत्याची विश्वासार्हता धोक्यात येईल असे वक्तव्य मी करणार नाही. जयंत पाटील हे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते कोणाच्या संपर्कात आहेत हे मला माहिती नाही. ते माझ्या संपर्कात तरी नाहीत.
जयंत पाटलांसह वडेट्टीवार भाजप प्रवेशाची शक्यता ? – विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या ताकदीने काँग्रेसची बाजू मांडत आहेत. परंतु, अशोक चव्हाणांप्रमाणे तेही लवकरच भाजपात जातील अशा अफवा पसरल्या आहेत. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाला साध देण्यासाठी जे लोक भाजपात येणार असतील त्यांच्यासाठी भाजपचा दुपट्टा तयार आहे. परंतु, विजय वडेट्टीवार यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS