Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरूण गवळीची तुरुंगातून होणार कायमची सुटका ?

मुंबई प्रतिनिधी - डॉन अरुण गवळीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अरुण गवळीची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. अरुण गवळीची शिक्षेत

कल्याण स्थानकात एक्स्प्रेस पकडताना प्रवाशांचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
भाजपला लोकांनी सकशेप नाकारायला सुरुवात केली आहे –  कुणाल पाटील 
शाहरुख खानची चाहत्यांना वाढदिवसानिमित्त भेट, ‘डंकी’चा शानदार टीझर रिलीज

मुंबई प्रतिनिधी – डॉन अरुण गवळीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अरुण गवळीची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. अरुण गवळीची शिक्षेतून सूट देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर गवळीची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र, गृह विभाग यावर काय हरकत घेणार याकडे लक्ष असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉन अरुण गवळी याची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने दिले आहे. २००६ च्या एका शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने गवळीला मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासन आणि गृहविभागाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे.

COMMENTS