Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदान न करणार्‍या शिक्षक मतदारांवर कारवाई होणार का ?

नाशिक विभागात 4522 शिक्षक मतदारांनी फिरविली मतदानाकडे पाठ

कोपरगाव शहर ः भारतीय राज्यघटने देशातील वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकाला देशातील  लोकशाहीच्या लोकसभा, विधानसभा, पदवीधर, शिक्षक मतदार स

दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार जेरबंद
पाथर्डी शेवगाव महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेला कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
लाच प्रकरणातील पोलिसाला अखेर पोलिसांनी पकडले

कोपरगाव शहर ः भारतीय राज्यघटने देशातील वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या प्रत्येक नागरिकाला देशातील  लोकशाहीच्या लोकसभा, विधानसभा, पदवीधर, शिक्षक मतदार संघ, स्थानिक स्वराज्य संस्था अशा वेगवेगळ्या मतदान प्रक्रिये करता मतदानाचा अमूल्य असा हक्क दिला असून तो प्रत्येकाने आपल्या उज्वल भविष्यासाठी उत्तम लोकप्रतिनिधी निवडण्याकरता बजावणे अत्यंत गरजेचे आहे. शंभर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करत असते यात महत्त्वाची भूमिका ही सर्व स्तरातील शाळा महाविद्यालयातील शिक्षक वृंद पार पाडत असतात ते शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यां मार्फत वेगळे कार्यक्रम घेत मतदान जनजागृती करत मतदानाचे महत्त्व सामान्य नागरिकांना पटवून देत 100% मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन करत असतात. परंतु नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक प्रक्रियेत नेहमीच शंभर टक्के मतदान करण्याचे सामान्य मतदारांना आवाहन करत असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील 4522 शिक्षक मतदारांनीच मतदान न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ 5 जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात 2118, अहमदनगर जिल्ह्यात 1065, धुळे जिल्ह्यात 508, नंदुरबार जिल्ह्यात 209 तर जळगाव जिल्हातील 622 असे 4522 शिक्षक मतदारांनी लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावला नसून मतदान न करणार्‍या या शिक्षक मतदारांवर निवडणूक आयोग अथवा शिक्षण विभाग कडक कारवाई करणार का? विशेष म्हणजे शासनाने या दिवशी सर्व शिक्षक मतदारांनी 100 टक्के मतदान करावे या साठी भर पगारी सुट्टी देखील जाहीर केली होती त्यामुळे या सुट्टीचा उपयोग 4522 शिक्षकांनी मतदान न करता कुटूंबासमवेत फिरण्यात घालविला की इतर काही अडचणी होत्या याची सखोल चौकशी होऊन संबंधित मतदान न करणार्‍या शिक्षकांवर कारवाई होणार का? असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडला आहे

कोपरगाव तालुक्यातील 2029 शिक्षकांनी केले मतदान – कोपरगाव तालुक्यात 2168 इतके शिक्षक मतदार असून यातील 2029 शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर तालुक्यातील तब्बल 139 शिक्षक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.

COMMENTS