Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिनेट निवडणूक स्थगित का केली?

मुंबई उच्च न्यायालयाचा विद्यापीठ आणि सरकारला सवाल

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटले आहे. याप्रकरणी विद्यापीठाच्या या निर्णयान

हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी हरित क्रांती घडवतील : मुख्यमंत्री फडणवीस
सावित्रीमाई स्मृतिदिनी आयटक, एआयएसएफ तर्फे अभिवादन
गांजा, अफूची विक्री करणार्‍या महिलेसह तिघे अटकेत

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटले आहे. याप्रकरणी विद्यापीठाच्या या निर्णयानंतर काही विद्यार्थी संघटना आणि सामजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सिनेट निवडणूक स्थगित का केली, असा सवाल करत राज्य सरकार आणि विद्यापीठाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
 मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक जाहीर केल्यानंतर सदर निर्णय आठ दिवसातच मागे घेतला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयावरून राजकीय आणि अराजकीय विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सिनेट निवडणूक स्थगितीचा वाद थेट कोर्टात पोहाचला होता. मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेची मुंबई हायकोर्टाने गंभीर घेतली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई हायकोर्टाने सिनेट निवडणूक स्थगित का केली? असा सवाल विचारला. तसेच मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार आणि विद्यापीठाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने राजकीय दबावातून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक स्थगित केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला.

COMMENTS