आजच्या काळात टॅटू काढणे हा ट्रेंड बनला आहे. ही फॅशन जरी असली तरी प्रत्येकाला ती जपायची असते. आजकाल तरुणाईमध्ये शरीरावर टॅटू काढण्याची क्रेज पाहाय

आजच्या काळात टॅटू काढणे हा ट्रेंड बनला आहे. ही फॅशन जरी असली तरी प्रत्येकाला ती जपायची असते. आजकाल तरुणाईमध्ये शरीरावर टॅटू काढण्याची क्रेज पाहायला मिळते.
टॅटू बनवणाऱ्या लोकांच्या मनात एक प्रश्न खूप फिरतो, तो म्हणजे टॅटू काढल्यानंतर ते रक्तदान का करू शकत नाही ? तर WHO च्या म्हणण्यानुसार, टॅटू काढल्यानंतर तुम्ही ६ महिने रक्तदान करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला या मागचे कारण सांगणार आहोत. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे यात पुन्हा सुईचा वापर केला जातो, ज्यामुळे रक्तातून पसरणारे आजार होण्याचा धोका वाढतो. टॅटूसाठी वापरण्यात येणारी शाई देखील बदलत नाही, ज्यामुळे एचआयव्ही आणि हेपेटायटीस बी संसर्गाचा धोका वाढतो. अशा लोकांनी त्वरित रक्तदान करणे टाळावे. सध्या टॅटू काढण्यासाठी कोणतेही नियम नाहीत, कोणीही केव्हाही सहज गोंदवू शकतो. सध्या कोणालाही टॅटू काढण्याची परवानगी आहे, म्हणूनच रोगांचा धोका कायम आहे. यामुळेच टॅटू आर्टिस्टला चांगल्या पार्लरमधून टॅटू बनवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून स्वच्छतेची पूर्ण काळजी घेता येईल. टॅटू काढल्यानंतर रक्त तपासणी करून घेतल्यानंतरच रक्तदान करावे, यासाठी किमान ६ महिने प्रतीक्षा करावी लागेल.
COMMENTS