Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इराणी युद्धनौका बुडाल्यानंतरही पंतप्रधान मोदींचे मौन का?काँगे्रस नेते राहुल गांधी यांचा सवाल

नवी दिल्ली : श्रीलंकेजवळ हिंद महासागरात इराणच्या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल

एपस्टीन फाइल्समधे पंतप्रधान मोदींचे नाव नाही
अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारत दौर्‍यावर
US Sinks Iran Warship: Rahul Gandhi Says India Needs Steady Hand, Not A  'Compromised PM'

नवी दिल्ली : श्रीलंकेजवळ हिंद महासागरात इराणच्या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेल्या मौनावर टीका केली आहे. या घटनेबाबत पंतप्रधानांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याने त्यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्‍न उपस्थित केले.
राहुल गांधी यांनी सामाजिक माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये पश्‍चिम आशियातील वाढता संघर्ष आता भारताच्या दाराशी येऊन ठेपल्याचा इशारा दिला. भारताने आपली रणनीतिक स्वायत्तता गमावली असल्याचा आरोप करत त्यांनी सध्याच्या परिस्थितीत ठाम आणि स्पष्ट नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, हिंद महासागरात इराणची युद्धनौका बुडाल्यानंतरही केंद्र सरकारकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी खाडी प्रदेशातील वाढत्या तणावाचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होणार्‍या परिणामाबाबतही चिंता व्यक्त केली. भारतात येणार्‍या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी मोठा हिस्सा होर्मुझ सामुद्रधुनीतून येत असल्याने या मार्गावरील अस्थिरतेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही इराणी युद्धनौका ‘आइरिस देना’ भारतातील विशाखापट्टणम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल प्रदर्शनात सहभागी झाल्यानंतर परतत होती. या कार्यक्रमासाठी भारताकडूनच या जहाजाला निमंत्रण देण्यात आले होते. जहाजावर सुमारे 180 कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाच्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेक मृतदेह सापडले असून काही जणांना बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढले आहे. जखमींवर श्रीलंकेतील गाले येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS