मुंबई प्रतिनिधी - मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांची दादर पोलिसां(Dadar Police) कडून सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली.
मुंबई प्रतिनिधी – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांची दादर पोलिसां(Dadar Police) कडून सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर दादर पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांशी किशोरी पेडणेकर यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “पोलिसांचं बोलावणं आलं तेव्हाच मी सांगितलं की तीन दिवस मी बिझी आहे, पण मी येणार चौकशीला. कर नाही तर डर कशाला? ती म्हण मी कायम ठेवली. अडीच तास पोलिसांची चौकशी झाली. पण बराच वेळ गप्पांमध्ये गेला. पण त्यानंतर प्रश्न विचारले त्यांची मी मला माहित असलेली उत्तरं दिली.” तसंच प्रत्येक आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी लगावला.
COMMENTS