Homeताज्या बातम्यासंपादकीय

संथगतीने मतदानाचा फटका कुणाला ?

सर्वाधिक म्हणजे तब्बल 97 कोटी मतदार असलेल्या भारत देशाला निवडणुका नव्या नाहीत. तब्बल 17 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगान

संपत्तीच्या गुर्मीतूनच बेधुंदशाही !
चिन्ह गोठवले, पुढे काय… ?
जनतेचा कौल कुणाला मिळणार  ?

सर्वाधिक म्हणजे तब्बल 97 कोटी मतदार असलेल्या भारत देशाला निवडणुका नव्या नाहीत. तब्बल 17 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदान यापूर्वी घेतलेले आहे. काही अपवाद वगळता सर्व मतदान पारदर्शक आणि निकोप पद्धतीत पार पडले आहेत. यात शंका नाही. लोकसभा व्यतिरिक्त, विधानसभा, विधानपरिषद आणि राष्ट्रपती निवडणुकीचा दीर्घ अनुभव भारतीय निवडणूक आयोगाच्या पाठीशी असतांना महाराष्ट्रातील मुंबईमध्ये सहा मतदारसंघासाठी सोमवारी झालेले मतदान अतिशय संथगतीने झाल्याचा आरोप होत आहे. शिवाय मुंबईमध्ये सर्वाधिक मतदानांची टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे. इतका प्रदीर्घ अनुभव असतांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान का संपले नाही, हा मोठा यक्षप्रश्‍न आहे. रात्री सहा वाजता अनेक मतदान केंद्रांवर रांगा होत्या, त्यामुळे लोकांना मतदान करण्यासाठी रात्रीचे आठ वाजल्याचे दिसून येत होेते, त्यामुळे अनेकांनी परतीची वाट धरणे पसंद केले. त्यामुळे हा गलथानपणा, हा संथपणा नेमक्या कोणत्या बाबीमुळे घडला, याची चौकशी होण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्य सचिव चौकशी करून अहवाल सादर करतील, परंतु या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घेऊन चौकशी करण्याची खरी गरज होती. संथ मतदानानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍या झडल्या. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीकची तोफ डागली.

शिवाय मशाल चिन्हावर उभ्या असलेल्या मतदारसंघातच विलंब झाल्याची टीका त्यांनी केली, तर दुसरीकडे संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आपणच केल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र नेमका गोंधळ कुठे उडाला, यासंदर्भात कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. खरंतर महाराष्ट्रामध्ये सोमवारी केवळ 13 मतदारसंघात मतदान झाले, अशावेळी संथगतीने मतदान होण्याचे कारण काय, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. जर मतदानयंत्रात बिघाड झाल्यास त्वरित दुसरे मशीन उपलब्ध करून दिले जाते, तशी तजवीज, तशा उपाययोजना निवडणूक आयोगाकडून करून दिल्या जात असतांना मुंबईवरील केंद्रात नेमके काय घडले, याची संपूर्ण चौकशी निवडणूक आयोगाने करण्याची गरज आहे. खरंतर मुंबईतील मतदानाची टक्केवारी घसरली आहे. कुठे 45 तर कुठे 50 तर कुठे 56 टक्के मतदानांच्या वर टक्केवारी गेलेली नाही. जर मतदानांची टक्केवारी वाढली नाही, उलट मतदानांची टक्केवारी कमी झालेली असतांना, प्रशासकीय यंत्रणेला मतदान करून घेण्यात कोणत्या अडचणी आल्या, याचा सर्व उहापोह होण्याची गरज आहे. एकतर भारतासारख्या देशामध्ये मतदान करण्याची मानसिकता लोकांची नाही. यादिवशी सरकारकडून सुट्टी जाहीर केली जात असल्याने अनेकजण बाहेर फिरायला जाण्यासाठी पसंदी देतांना दिसून येतात. परिणामी मतदानाची टक्केवारी घसरते. त्यातच मुंबई आणि पुण्यातील लोक कलासक्त असल्यामुळे दुपारची झोप अनेकांना अनिवार्य असते. त्यामुळे मतदानाला जाण्याचा कंटाळा येतो. अशापरिस्थिती जे लोक मतदानाला जातात, त्यांच्यासमोर भल्या मोठ्या रांगा असल्यावर हिरमोड न झाल्यास नवल वाटायला नको. त्यामुळे मुंबईतील मतदान संथगतीने होण्यास जबाबदार कोण, कोणाच्या इशार्‍यावरून या बाबी घडल्याशिवाय संथगतीने झालेले मतदान कुणाच्या पत्थ्यावर पडणार आहे, यासर्व बाबींची चौकशी होण्याची खरी गरज आहे. आणि या बाबींची निवडणूक आयोगाने चौकशी करण्याची खरी गरज आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जी दोन राज्ये प्रबोधन करण्यात अगे्रसर होती आणि सामाजिक चळवळी ज्या राज्यांनी चालवल्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. अशा राज्यात 2024मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेली टक्केवारी लाजीवाणी आहे. त्यामुळे मतांची टक्केवारी वाढण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे काळाची गरज ठरणार आहे. 

COMMENTS