Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयदत्त क्षीरसागरांनी गेल्या 40 वर्षात काय दिवे लावले ?

बीड सह तालूका भकास करण्याचे पाप त्यांच्याच माथ्यावर- शिराळे, घुमरे

बीड प्रतिनिधी - बीड शहरासह संपुर्ण मतदार संघावर गेल्या  40 वर्षापासून जयदत्त क्षीरसागर यांनी हुकुमत गाजवलेली आहे. मात्र या 40 वर्षात त्यांनी विका

आजचे राशीचक्र गुरुवार, ०४ नोव्हेंबर २०२१ अवश्य पहा (Video)
अशोक चव्हाण होणार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष ?
फेमस अभिनेते ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मामुकोया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बीड प्रतिनिधी – बीड शहरासह संपुर्ण मतदार संघावर गेल्या  40 वर्षापासून जयदत्त क्षीरसागर यांनी हुकुमत गाजवलेली आहे. मात्र या 40 वर्षात त्यांनी विकास करण्याचे तर सोडाच परंतु संपुर्ण परिसर भकास करण्याचे पाप केले आहे. तीन वेळा मंत्रीमंडळात काम करत असताना बीडला काय दिले? शिक्षण संस्थांच्या नावाखाली कर्मचार्यांची पिळवणूक ती यांची केली. नगर पालिका ताब्यात असताना सुध्दा सर्वसामान्यांना नागरी सुविधां पासून वंचित ठेवण्याचे पाप जयदत्त क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली घडलेले आहे. गेल्या 40 वर्षात क्षीरसागरांनी काय दिवे लावले? हे एकदाचे सांगावेच असा सवाल करत  आज बाजार समितीच्या निवडणूकीत शेतकर्यांना पुन्हा एकदा छळण्यासाठी ते खोटे आश्वासने देत असल्याचा घणाघात भाजपाचे जेष्ठ नेते नवनाथ शिराळे व शिवसेनेचे तालूकाप्रमुख संतोष घुमरे यांनी केला आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात शिराळे व घुमरे यांनी म्हटले आहे की, बीड नगर पालिकेच्या हद्द वाढीमध्ये क्षीरसागरांनी कोट्यावधींचा घोटाळा केला आहे. शिक्षण संस्थांच्या नावाखाली कर्मचार्यांची आर्थिक पिळवणूक करणे, दरवर्षी एक महिन्याचा पगार ढापणे, नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी घरच्या नोकरा सारखे वागवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  जागेमध्ये आपल्याच लोकांना गाळे देणे, जे व्यापारी नाहीत त्यांना मतदार बनवणे, सर्वसामान्यांना भुलथापा देवून भुलावत ठेवणे एव्हढेच उद्योग जयदत्त क्षीरसागर मंडळींनी केले आहेत. बीड नगर पालिकेसह संपुर्ण मतदार संघात त्यांनी कोट्यावधींचे घोटाळे क्षीरसागर यांनीच केले आहेत. शेतकर्यांच्या हक्काची असणारी बाजार समिती आतापर्यंत त्यांनीच गिळंकृत केलेली आहे. उडिद घोटाळ्यापासून ते त्या बाजार समितीच्या आसपासच्या जागांपर्यंतचा घोटाळा कोणी केला? हे बीडकरांना चांगलेच माहित आहे. ठराविक लोकांना खुश करण्यासाठी शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे काम क्षीरसागरांनी केले असून येणार्या काळात सर्वसामान्य जनता त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही अशी घणाघाती टिका भाजपाचे जेष्ठ नेते नवनाथ शिराळे व शिवसेना तालूकाप्रमुख संतोष घुमरे यांनी केली आहे.

COMMENTS