नवाब घराण्यातील मूळ सदस्य असलेले, परंतु, चित्रपट क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवलेले, अभिनेते सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला चर्चेचा विषय राहिला
नवाब घराण्यातील मूळ सदस्य असलेले, परंतु, चित्रपट क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवलेले, अभिनेते सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला चर्चेचा विषय राहिला. खरं म्हणजे हा हल्ला इतका सहजपणे झालेला दिसतो की, मुंबईसारख्या अतिशय सुरक्षित आणि अतिशय श्रीमंत विभागात प्रचंड सुरक्षितता असलेल्या ठिकाणी अगदी अकराव्या मजल्यावर हा हल्ला झालेला आहे. यावर अनेक प्रकारच्या उलट सुलट चर्चा होण आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हल्ला चोरांनी केला असून चोरीच्या इराद्याने केलेला आहे, हे स्पष्ट म्हटलं. त्यानंतर पोलीस यंत्रणेने देखील हीच गोष्ट पुन्हा निदर्शनास आणून दिलेली आहे. अर्थात, या घटनाक्रमामध्ये अनेक ऍंगल गृहीत धरल्या जात आहे. किंवा शक्यता वर्तवली जातआहेत. त्यातही खान समूहातील तीनही अभिनेते ज्या पद्धतीने रडारवर आहेत, त्या विषयाला घेऊनही चर्चा होते आहे. त्यामुळे, या विषयाला अनेक कंगोरे वेगवेगळ्या लोकांकडून शोधले जात आहेत. खरं म्हणजे अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला अगदी सुरक्षित ठिकाणी त्याच्या घरात घुसून जर कोणी हल्ला करत असेल तर, ती समाजाच्या दृष्टीने निश्चितपणे चिंता करणारी बाब असते. जर हाय प्रोफाईल विभागात अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणीच नागरिक सुरक्षित नसतील तर, इतरांच्या बाबतीत नेमकं काय? हा प्रश्न साहजिक उभा राहतो. मध्यरात्री सहाव्या मजल्यावर एक व्यक्ती दिसून आल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं गेलं. परंतु, त्याविषयी अजूनही स्पष्टता आलेली नाही. पोलीस वेगवेगळ्या अँगलने याच प्रकरणाची चौकशी करित आहेत. अर्थात सैफ अली खानच्या संदर्भामध्ये काही महत्वपूर्ण बाबीं अशा की, ते एका संस्थानिक असलेल्या कुटुंबाचा वारसा आहेत. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या त्यांच्या अनेक मालमत्ता या देशामध्ये आहेत. नवाब हे घराणच आहे. चित्रपटसृष्टीत काम करतानाही त्यांनी जो पैसा कमावला आहे, त्यापेक्षा, त्यांच्याकडे परंपरागत वारसा म्हणून आलेली संपत्ती अधिक आहे. त्याचमुळे त्यांची मुलं ही अगदी जन्मताच प्रसार माध्यमांची आकर्षण बनली. कारण, अगदी पहिल्या वाढदिवसाला कोट्यावधीची गाडी मुलांना भेट देणे; अशा गोष्टींपासून ही सुरुवात होते. शाहीपणा त्यांच्या एकूणच आयुष्यात आहे. दुसरी बाब म्हणजे चित्रपटसृष्टी मध्ये त्यांचा स्वतःचा असं वलंय आहे. तिसरी बाब चित्रपटसृष्टीतील अतिशय मोठी परंपरा असणाऱ्या कपूर कुटुंबाचे ते जावई आहेत. या सगळ्या गोष्टी गृहीत धरूनही त्यांच्यावर सहजपणे झालेला हल्ला, त्यांच्या प्रेक्षकांना संताप आणणारा आहे. एकूण भारतीय समाजाला तितकासा रुचलेला नाही, पटलेला नाही. त्यामुळे, त्याविषयी निश्चितपणे संताप व्यक्त केला जातो आहे. परंतु, कालांतराने यातील पत्ते देखील बाहेर येतील. ज्या पद्धतीने चोराने हा हल्ला घरात घुसून केला आहे, त्याचा अर्थ घरातील कुणी सदस्याने त्या व्यक्तीला प्रवेश दिला का? ही शक्यता जेव्हा पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला होता; त्यावेळेस पोलिसांना हे लक्षात आलं की, घरफोडी करणारे कोणत्याही आलिशान इमारतींच्या दरवाजांच्या कुलूप उघडू शकतात. परंतु, गोष्ट एवढीच नाही. एखाद्या नव्या इमारतीत तिची रचनाच माहित नाही; अशा ठिकाणी प्रवेश करताना कोणताही चोर किंवा कोणताही गुन्हेगार निश्चितपणे विचार करेल! याचा अर्थ, यापूर्वी त्यांनी त्या इमारतीचे आत मध्ये जाऊन रेकी केली आहे किंवा काय? या शक्यता पोलिसांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या बनल्या आहेत!
COMMENTS