Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीजेचं सामान घ्यायला गेले, पण घरी परतलेच नाहीत!

बचावलेला एकजण शॉकमध्ये

 गडचिरोली:  पंकज बागडेहा(Pankaj Bagdeha) गडचिरोली(Gadchiroli) तील तरुण डीजे वादक. अल्पावधित त्याने आपली ओळख तयार केली होती. वय अवघं 26 वर्ष. डीजे

भरधाव दुचाकीस्वाराने तरुणाला दिली धडक
विदर्भातील दोन अपघातात 13 जणांचा मृत्यू
चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू

 गडचिरोली:  पंकज बागडेहा(Pankaj Bagdeha) गडचिरोली(Gadchiroli) तील तरुण डीजे वादक. अल्पावधित त्याने आपली ओळख तयार केली होती. वय अवघं 26 वर्ष. डीजेची आवड त्याला त्याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे घेऊन गेली. डीजेसंदर्भातीलच सामान खरेदीसाठी चंद्रपूरला  जाण्याचा बेत त्याने आखला. पंकजसह दोघे मित्र आणि एक दाम्पत्य असे पाच जण मिळून चंद्रपूरला निघाले. डीजेचं सामान घेतली आणि पुन्हा घरी परतीच्या वाटेला लागले. पण प्रवासात भयंकर प्रसंग घडला. नवरा-बायकोसह पंकज आणि त्याच्या आणखी एका मित्राचा दुर्दैवी अंत  झाला. गाडीचा तर चक्काचूर झाला होता. बचावलेल्या एका मित्राला स्थानिकांनी कसंबसं गाडीतून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. शुद्धीवर येईपर्यंत त्याच्याही मनावर मोठा आघात झाला होता.

 

COMMENTS