शिवसेनेसोबत युती करू पण एमआयएमसोबत नाही : अ‍ॅड. आंबेडकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेसोबत युती करू पण एमआयएमसोबत नाही : अ‍ॅड. आंबेडकर

मुंबई : फेबु्रवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, वंचित बहुजन आघाडीने देखील मुं

मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे सेट परीक्षेत यश  
सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर | ‘१२ च्या १२ बातम्या’ | Lok News24
किनवट शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

मुंबई : फेबु्रवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, वंचित बहुजन आघाडीने देखील मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लीम लीगसोगत आघाडी करणार असल्याचे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी एमआयएमसोबत युती करण्यास स्पष्ट नकार देत, आम्ही शिवसेनेसोबत युती करून, पण एमआयएमसोबत नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
तीन पक्ष मिळून जानेवारीच्या मध्यापर्यंत जागावाटप जाहीर करणार असल्याची घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले. यासोबतच आणखी काही पक्ष देखील आमच्यासोबत येत आहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार आहोत. उद्या आम्ही प्रचाराला सुरूवात करत आहोत. अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही. मात्र उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते घटनाविरोधी असल्याचे मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले आहे. वारंवार कोरोनाच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचे आहे. आणीबाणी जरी घोषित होणार असेल तरी निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले.काँग्रेस सोबत युती करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना सतत म्हटले होत की, तुम्ही ज्या जागा हरलेल्या आहात त्या आम्हाला द्या अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या मनात भीती आहे की हरलेल्या जागा हे जिंकतात त्यामुळे आपले पुढे जाऊन काय होणार? असा त्यांना प्रश्‍न सतावत आहे. त्यामुळे ते युती करायला घाबरत आहेत. म्हणूनच आम्हाला भाजपची बी टीम काँग्रेस वारंवार म्हणत आहे. मात्र आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एमआयएम सोबत महापालिका निवडणूक लढवणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत परंतु ते आमच्या सोबत येतील का? हा प्रश्‍न आहे. आम्ही सेक्युलर पार्टीसोबत युती करायला तयार आहोत. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही
निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर बोलतांना आंबेडकर म्हणाले की, उद्या युद्ध जरी झालं आणि युद्धाला जरी सुरूवात असेल, आणीबाणी जरी जाहीर करायची झाली तरी निवडणूक पुढे ढकलता येत नाही. येणारं नवं सरकार, नवीन लोकांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो लोकसभा, विधानसभेच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे, की एकदा निवडणूक जाहीर झाली की आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. निवडणुका पुढे ढकलण्याचा संविधानात अधिकार नसल्याचे देखील यावेळी आंबेडकरांनी स्पष्ट केले.

COMMENTS