Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आम्ही श्रेयवादाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो ः मा.आ. कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी - कोल्हे कुटुंब तीन पिढ्यांपासून समाजकारण व राजकारण करत असून, माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हेसाहेबांचा समाजकार्याचा वारसा पुढे च

दैनिक लोकमंथन l बोठेशी संबंधित ‘त्या’ फोनचे फॉरेन्सिक अहवाल प्रतीक्षेत
जनसेवा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला महिलांची अलोट गर्दी
तुकाराम भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी – कोल्हे कुटुंब तीन पिढ्यांपासून समाजकारण व राजकारण करत असून, माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हेसाहेबांचा समाजकार्याचा वारसा पुढे चालवत त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही वाटचाल करत आहोत. आमची बांधिलकी जनतेशी असून, विरोधकांप्रमाणे आम्ही श्रेयवादाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो. शिंगणापूर गावासह कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासाचे प्रश्‍न सोडविण्यास आमचे प्राधान्य आहे. यापुढील काळातही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. अशी ग्वाही माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे ग्रामपंचायतच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेतून संजीवनी गेट येथे रस्ता काँक्रिटीकरण (10 लाख रुपये), गणेशनगर येथे बंदिस्त गटार/पेव्हर ब्लॉक (10 लाख रुपये), ज्ञानेश्‍वरनगर येथे बंदिस्त गटार करणे (9 लाख रुपये), दत्तनगरमध्ये रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार करणे (13 लाख रुपये), 15 व्या वित्त आयोगातून स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड करणे (2 लाख रु.), गणेशनगरमध्ये शाळा परिसरात बंदिस्त गटार करणे (दीड लाख रु.), 28 नं. चारी येथे रस्ता दुरुस्ती (4 लाख 38 हजार रु.), ग्रामनिधीतून स्मशानभूमी खोली दुरुस्ती (1 लाख रु.), गणेशनगरमध्ये शाळा खोली दुरुस्ती (1 लाख रु.), 28 नं. चारी येथे गावांतर्गत रस्ता मुरूमीकरण करणे (2 लाख रु.), संजीवनी गेट येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे (2 लाख रुपये) अशा विविध विकासकामांचा शुभारंभ स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी (9 सप्टेंबर) करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी उपसरपंच रत्नाताई श्याम संवत्सरकर, माजी सरपंच कुसुमताई संवत्सरकर, शिल्पाताई संदीप संवत्सरकर, राजश्रीताई काळे, भगवान संवत्सरकर आदींनी स्नेहलताताई कोल्हे यांचे स्वागत केले. सरपंच डॉ. विजय काळे, माजी सरपंच यादवराव संवत्सरकर, भीमा संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ, प्रमोद संवत्सरकर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत संवत्सरकर तर आभार प्रदर्शन अविनाश संवत्सरकर यांनी केले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे शिंगणापूर गावावर विशेष प्रेम  होते. शिंगणापूरच्या विकासात कोल्हे कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. कोल्हे कुटुंबीयांचे शिंगणापूर गावाशी आपुलकीचे नाते असून, कोणी कितीही राजकीय आक्रमण केले. तरी हे नाते तुटणार नाही. येथील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी नेहमीच कोल्हे कुटुंबीयांना साथ दिली आहे.

कार्यक्रमास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मच्छिंद्र लोणारी, राजेंद्र लोणारी, रंगनाथ संवत्सरकर, भाऊलाल कुर्‍हे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यशवंत संवत्सरकर, पं. स. चे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रदीप जगताप, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे, दत्तू संवत्सरकर, शेखर कुर्‍हे, संजय तुळसकर, दिगंबर कुर्‍हे, प्रसाद आढाव, प्रशांत आढाव, श्याम संवत्सरकर, बाबासाहेब संवत्सरकर, दिलीप आढाव, नवनाथ संवत्सरकर, जालिंदर गोरख संवत्सरकर, दिलीप चौखंडे, दिनकर मोरे, योगेश महाले, किशोर सानप, विश्‍वास जानराव, सुनील भोसले, अजय संवत्सरकर, ज्ञानेश्‍वर संवत्सरकर, सोमनाथ चिंधुपुरे, अण्णा संवत्सरकर, कृष्णा संवत्सरकर, कैलास येडूबा संवत्सरकर, अशोक वराट, मनोज इंगळे, सतीश निकम, नंदू शुक्ला, दीपक राऊत, रोहित कनगरे, सिद्धार्थ साठे, मंगेश गायकवाड, गणेश राऊत, अमित राजपूत, ओंकार कोल्हे, राहुल सुपेकर, अली पठाण, नानासाहेब निकम, संतोष थोरात, समाधान कुर्‍हे, पंकज कुर्‍हे, मनीष निकम, प्रथमेश इंगळे, अमोल वाघ, भैय्या मुळेकर, संकेत मगर, संतोष सदगीर, शिवा सुपेकर, सचिन पगारे, नितीन जाधव आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही एकजूट अशीच कायम ठेवून यापुढेही कोल्हे कुटुंबीयांना साथ द्या. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब हे आदर्श राजकारणी व असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या भल्यासाठी सदैव विकासाचे राजकारण केले. शेती, पाणी, सर्वसामान्य शेतकरी व जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. संजीवनी महिला बचत गटात काम करताना त्यांचा आदर्श घेऊन मी विधिमंडळात पोहोचले. मी आमदार असताना विधिमंडळात कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रश्‍न मांडून ते सोडविले. –मा.आ. स्नेहलता कोल्हे

COMMENTS