Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद

पुणे/प्रतिनिधी ः पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहराच्या विविध भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शहरातील काही

आयपीएस देवेन भारतीविरोधात गुन्हा दाखल | LOKNews24
महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अर्जेंटिनाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य
चक्क ! तरुणाने बियर शॉप चालवणाऱ्या महिलेची चैन हिसकावून काढला पळ

पुणे/प्रतिनिधी ः पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहराच्या विविध भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शहरातील काही भागांत 15 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी असे दोन दिवस टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

15 फेब्रुवारी रोजी सणस पंपिंग स्टेशनवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून तर 16 फेब्रुवारी रोजी चतु:शृंगी, पद्मावती आणि कँटोन्मेंटच्या नवीन शुद्धीकरण प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. नर्‍हे, धायरी, धायरी खंडोबा मंदिर परिसर या भागातील नागरिकांना उद्या पाणी पुरवठा होणार नसून परवा देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती मनपाने दिली आहे. तर 16 फेब्रुवारी रोजी कँटोन्मेंट, रामटेकडी-खराडी नोबल हॉस्पिटल : ससाणेनगर, काळे बोराटेनगर, हडपसर गावठाण, बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, महर्षिनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर चिंतामणीनगर, स्टेट बँकनगर, लेक टाउन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, आकाशवाणी (15 नंबर), लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर. या परिसरात भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने 16 तारखेला पाणी पुरवठा होणार नाही.

COMMENTS