Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरपरिषदेअंतर्गत रहिवाशांना 9 ते 10 दिवसांच्या अंतराने पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त असून या विरोधात आंद

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी
भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार
राजारामबापू साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकर्‍यांना फळझाडांचे वाटप

म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरपरिषदेअंतर्गत रहिवाशांना 9 ते 10 दिवसांच्या अंतराने पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त असून या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी सातारा यांना पाठवण्यात आले असून त्याची प्रत मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना काँग्रेस पदाधिकार्‍यांनी नुकतीच दिली. यावेळी पुणे विभाग किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. विश्‍वंभर बाबर, माजी नगरसेवक विकास गोजारी, युवक काँग्रेसचे दाऊद मुल्ला, शिवदास सराटे, दीपक राज महामुनी, विठ्ठल कवडे, अनिल लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
म्हसवड नगरपरिषद अंतर्गत पिण्याचे पाणी पुरवठा व्यवस्था अत्यंत ढिसाळ झाली असून प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सध्या शहरात 9 ते 10 दिवसाच्या अंतराने पिण्याचे पाणी येत आहे. तीव्र उन्हाळा, वाढता उष्मा,यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज वाढलेली असून याबाबत नगरपालिका प्रशासन गप्प का? असा संतप्त सवाल तमाम नागरिकांकडून वारंवार उपस्थित केला जात आहे.
भविष्याचा विचार करता प्राधिकरणाची नव्याने दुसरी पाईपलाईन महत्त्वाची आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत तातडीची उपाययोजना म्हणून उरमोडी कॅनॉलचे पाणी दिवड तलावा मार्गे म्हसवड माणगंगा नदीतील शेंबडे वस्ती बंधार्‍यात सोडावे. नगरपालिका मालकीच्या शेंबडे वस्ती विहीर व इतर विहिरीतील गाळ काढून पाणीसाठा वाढवावा. सध्या सुरू असणार्‍या शेंबडे वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत पंपाला ग्रामीण ऐवजी म्हसवड शहराप्रमाणे वीज पुरवठा करावा. या व इतर मागण्या काँग्रेस पदाधिकार्‍यांनी लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

COMMENTS