Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली

राहुरी ः मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून होणार्‍या तुफानी पर्जन्यवृष्टीने धरणाकडे झपाट्याने पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सायंकाळी

कोपरगाव मतदार संघातील रस्ते व पुलांसाठी ३.८४ कोटी निधी मंजूर:आमदार आशुतोष काळे
लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना पुरस्कार प्रदान 
काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा

राहुरी ः मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून होणार्‍या तुफानी पर्जन्यवृष्टीने धरणाकडे झपाट्याने पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सायंकाळी धरणाकडे विक्रमी 25 हजार 828 क्युसेकने आवक सुरू होती तर मुळा धरण 45 टक्के भरले आहे. गुरूवारी सकाळी दहा वाजता कोतुळकडील येथील मुळा नदीतून मुळा धरणाकडे सव्वा चार मीटर ला तब्बल 16 हजार 750 क्युसेक वेगाने आवक सुरू होती. दुपारी बारा वाजता त्यात वाढ होऊन 24 हजार क्युसेकने सुरू होती तर सायंकाळी सहा वाजता या हंगामातील ही सर्वात मोठ्या प्रमाणातील आवक तब्बल 25 हजार  828 क्युसेकने आवक सुरू होती मानली जात आहे. कोतुळकडील मुळा नदी पाच मीटरला पातळीने दुथडी भरून वाहत आहे. गेल्या दोन दिवसापासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे तुफान बॅटिंग सुरू आहे. हरिश्‍चंद्रगड कडील पाणलोटात मोठी पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मुळा धरण साठा आज सकाळी दहा हजार 636 दशलक्ष फुटावर ( 41 टक्के ) पोहोचला तर पाण्याची पातळी 1 हजार 777.20 इतकी झाली. 24 तासात धरणात तब्बल पाउण टीएमसी पाणी जमा झाले. सकाळी कोतुळ येथून लहित खुर्द येथील जलमापन केंद्रावर धरणाकडे दहा हजार 342 क्युसेकने सुरू होती , त्यात सकाळी दहा वाजता आणखी वाढ होत 16 हजार 750 क्युसेक इतकी विक्रमी  सुरू होती. पाण्याची आवक पाहता मुळा धरण दोन दिवसात निम्मे भरण्याची चिन्हे दिसून येत आहे.

COMMENTS