Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री पवार व विखे यांच्या प्रयत्नातून भीमा नदीत पाणी : विनोद दळवी

कर्जत : तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे भिमा नदीचे पात्र कोरडेठाक  पडले होते. त्यामुळे कर्जत शहरासह तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना बंद

एसटी डेपो मंजूर करता आला नाही त्यांचे एमआयडीसीचे आश्‍वासन
जिल्हा बँकेने वीज बिलांसाठी शेतकर्‍यांना कर्ज द्यावे ; महसूल मंत्री थोरातांनी केली सूचना
‘स्टॉक’ जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ | Maharashtra Lockdown | LokNews24

कर्जत : तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे भिमा नदीचे पात्र कोरडेठाक  पडले होते. त्यामुळे कर्जत शहरासह तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत होता. तीव्र दुष्काळामुळे निर्माण झालेले पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपचे आ. प्रा. राम शिंदे व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भिमा नदी पात्रात पाणी सोडण्याचे नियोजन करून भिमा नदी पात्रामध्ये पाणी सोडले असल्याची माहिती युवा नेते विनोद दळवी यांनी दिली.
दळवी यांनी पुढे म्हटले आहे की, कर्जत शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत होणार आहे. कर्जत नगरपंचायतने 6 लाख 90 हजार लिटर पाण्याची मागणी सरकारकडे केली होती. ती मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुर्ण करून तात्काळ नगरपंचायतला टँकर उपलब्ध करून दिले. मंजूर खेपा व पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपंचायतची असतानाही नगरपंचायत कर्जतकरांना पाणी पुरवठा करण्यात कमी पडली असा आरोपही दळवी यांनी केला. 6 लाख 90 हजार लिटर पाणी मंजूर होते. त्याप्रमाणे नगरपंचायतने 4 ते 5 दिवसाला पाणी देणे अपेक्षित होते. पण येथे आ. रोहित पवार यांचे पाण्याचे टँकर चालू आहेत. त्याची जाहिरात करून पाणी फक्त आम्हीच देवू शकतो, असा केविलवाणा प्रयत्न करून कर्जतकरांना पंधरा- पंधरा दिवस पाण्यापासून वंचित ठेवले आहे. जनतेवर झालेल्या अन्यायाचा बदला कर्जतची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही दळवी यांनी म्हटले आहे.

COMMENTS